Gold Silver Price: सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Gold Silver Price: सोने-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत घसरण होताना दिसत आहे. पण गुरुवारी अचानक सोन्याच्या किंमतीत किरोकाळ वाढ झाली होती. पण आज जागतिक बाजारपेठेतील नरमाईमुळे भारतीय बाजारात पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याची किंमत ०.९ टक्क्यांनी घसरून ५० हजार १३० रुपये प्रति ग्रॅम झाली आहे. तर चांदीची किंमत ०.४ टक्क्यांनी घसरून ६० हजार ६०५ रुपये प्रति किलोग्रॅमवर आली आहे. गेल्या सत्रात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याची किंमत ०.४ टक्क्यांनी वाढली होती, तर चांदीची जवळपास १.६ टक्क्यांनी वधारली होती. गांधी जयंतीमुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंज निमित्त बाजार बंद होता. आज तीन दिवसांनंतर बाजार उघडल्यावर सोन्या, चांदीमध्ये नफावसुली दिसून आली आहे.

हे वाचा – घरातल्या सोन्यावर दुप्पट नफा मिळवण्याची संधी; SBI ची स्किम तर बघा

जागतिक बाजारपेठेतील सोन्याच्या किंमतीत आज थोडा बदल झाला आहे. गुंतवणूकदरांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत केले. त्याच्याच परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. सोन्याची किंमत १,९०० डॉलरच्या आसपास होती, तर आता अमेरिकेत सोन्याची किंमतीत ०.१ टक्क्यांची घसरण झाली असून १,९०६.३० डॉलरवर पोहोचली आहे. सोन्याच्या किंमतीला कमजोर डॉलरचा आधार मिळाला आहे, ज्यामुळे इतर चलनांच्या धारकांना मौल्यवान धातू स्वस्त मिळत आहे. दरम्यान डॉलरचा इंडेक्स ०.१२ टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे चांदीची किंमत ०.८ टक्क्यांनी वधारुन २३.८९ डॉलर प्रति औंस झाली आहे. तर प्लॅटिनमची किंमत ०.१ टक्क्यांनी घसरून ८८१.५१ डॉलर आणि पॅलिडियममध्ये २,३०७.६४वर पोहोचले आहेत.


हेही वाचा – JEE Advanced 2020 Results: JEE Advanced परीक्षेचा निकाल जाहीर