घरअर्थजगतSBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; दोन हजार पीओ पदांसाठी निघाली भरती; असा करा...

SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; दोन हजार पीओ पदांसाठी निघाली भरती; असा करा अर्ज

Subscribe

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती होणार आहे. SBI ने परिवीक्षा अधिकारी (Probationary Officer) भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरा अन्यथा संधीला मुकाल. एसबीआय पीओ भरती २०२० साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ४ डिसेंबर २०२० पूर्वी बँकेच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्जाच्या छपाईची अंतिम तारीख १९ डिसेंबर २०२० असेल.

या भरतीसाठी प्रारंभिक परीक्षा स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ३१ डिसेंबर २०२० आणि २, ४ आणि ५ जानेवारी २०२१ रोजी ऑनलाईन घेण्यात येईल. एसबीआय भरती प्राथमिक परीक्षेचा निकाल जानेवारी २०२१ च्या तिसर्‍या आठवड्यात जाहीर केला जाईल. एसबीआय भरती प्राथमिक परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना २९ जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या मुख्य परीक्षेस पात्र ठरवले जाईल. मुख्य परीक्षेचा निकाल फेब्रुवारीच्या तिसर्‍या किंवा चौथ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.

- Advertisement -

एसबीआयच्या या भरतीत पीओची २००० पदे भरली जाणार आहेत. यापैकी ८१० रिक्त जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत, ५४० ओबीसी, ३०० एससी, २०० ईडब्ल्यूएस आणि १५० रिक्त जागा एसटी प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी आहेत.

शैक्षणिक पात्रता

बँक पीओसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी पदवी अंतिम वर्षाचे/सेमिस्टर आहेत तेदेखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात. परंतु हे लक्षात ठेवा की मुलाखतीवेळी पदवीधर असणे आवश्यक आहे. अर्ज करणारे उमेदवार ३१.१२.२०२० पूर्वी पदवी पास असणे आवश्यक आहे.

- Advertisement -

अर्ज शुल्क

सामान्य श्रेणी, ईडब्ल्यूएस आणि ओबीसीसाठी शुल्क ७५० रुपये आहे. इतर आरक्षित प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -