घरदेश-विदेशदिलासादायक! अवघ्या दीड रूपयांच्या गोळीने बरे होणार कोरोना रूग्ण!

दिलासादायक! अवघ्या दीड रूपयांच्या गोळीने बरे होणार कोरोना रूग्ण!

Subscribe

वुहानमध्ये मेटफॉर्मिन ठरले प्रभावी

कोरोना संकटाशी सामना करणारे हे जग अद्याप कोरोनाची यशस्वी लसीच्या शोधत आहे. जगातील अनेक देश कोरोना लस विकसित करण्यासाठी धडपडत आहेत. दुसरीकडे, शास्त्रज्ञ कोरोनामुळे संसर्ग झालेल्या लोकांना बरे करण्यासाठी काही जुनी औषधे आणि फॉर्म्युलेशनवर संशोधन करत आहेत. दरम्यान, अवघ्या दीड रुपयांच्या चमत्कारिक प्रभावाने जगभरातील डॉक्टर आश्चर्यचकित झाले आहेत. हे स्वस्त औषध मेटफॉर्मिन असून सामान्यत: मधुमेहाच्या रुग्णांना बरे करण्यासाठी वापरले जाते. हे औषध आता कोरोना रूग्णांवरही वापरले जात असल्याचा दावा केला जात आहे, तसेच या औषधाचा दिलासादायक परिणाम देखील समोर आले आहेत.

मृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मदत

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या वुहानमधील डॉक्टरांनी मेटफॉर्मिनवर संशोधन केले आहे. काही केस स्टडीच्या आधारे, डॉक्टरांच्या मते, हे औषध कोरोनाच्या उपचारात प्रभावी असल्याचे आढळले आहे. त्याच वेळी अमेरिकेच्या मिनेसोटा विद्यापीठाने साधारण ६ हजार रुग्णांवर मेटफॉर्मिनचा प्रयोग केला आहे. मिनेसोटा विद्यापीठातील संशोधक असेही म्हणतात की मेटफॉर्मिन औषध कोरोनामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते.

- Advertisement -

हे औषध १९५० पासून वापरले जात आहे

इंग्रजी वृत्तपत्र द सनच्या वृत्तानुसार, ब्रिटनची आघाडीची आरोग्य संस्था, नॅशनल हेल्थ सर्व्हिस हे औषध आधीपासूनच वापरत आहे. हे औषध मधुमेह तसेच स्तन कर्करोग आणि हृदयरोगांमध्ये प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. टाइप २ मधुमेहावर उपचार करण्यासाठी हे औषध १९५० पासून वापरले जात आहे.

वुहानमध्ये मेटफॉर्मिन ठरले प्रभावी

कोरोना विषाणूचे जन्मस्थान म्हटले जाणाऱ्या वुहानमध्ये मेटफॉर्मिन हे औषध खूप प्रभावी ठरले आहे. एका अभ्यासात असे आढळले आहे की मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूची नोंद झाली आहे. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि मधुमेहाच्या रुग्णांनी हे औषध घेतलेल्या लोकांपेक्षा हे औषध घेणाऱ्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होते.

- Advertisement -

अभ्यासादरम्यान वुहानमधील डॉक्टरांना असे आढळले की, मेटफॉर्मिन घेणारे केवळ ३ रुग्णांता मृत्यू झाला आहे, तर अशा २२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला, ते हे औषध घेत नव्हते. डॉक्टरांनी मेट्रोफॉर्मिन घेतलेल्या कोरोनामधील गंभीर आजारी असलेल्या १०४ रुग्णांच्या अभ्यास केला. या रुग्णांची तुलना करताना इतर १७९ कोरोनाने गंभीर असणाऱ्या रुग्णांशी केली असल्याचे सांगितले जात आहे.


COVID-19 च्या उपचारासाठी असेलेल्या औषधाची ‘ही’ आहे किंमत!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -