घरताज्या घडामोडीखुशखबर! इन्कम टॅक्स भरण्याची मुदत वाढवली; ही आहे नवी डेडलाईन

खुशखबर! इन्कम टॅक्स भरण्याची मुदत वाढवली; ही आहे नवी डेडलाईन

Subscribe

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नोकदार लोकांना केंद्र सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे. सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने इन्कम टॅक्स भरण्याची मुदत वाढली असून नवी डेडलाईन जाहिर करण्यात आली आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नोकदार लोकांना केंद्र सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे. सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने इन्कम टॅक्स भरण्याची मुदत वाढली असून नवी डेडलाईन जाहिर करण्यात आली आहे. सरकारने आर्थिक वर्ष २०१८-१९ आणि आर्थिक वर्ष २०१९-२०ची इन्कम टॅक्स भरण्याची मुदत वाढवली आहे. प्राप्तिकर विभागाने बुधवारी एक अधिसूचना जारी करत आर्थिक वर्ष २०१८-१९ साठीचे इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै केली असून आर्थिक वर्ष २०१९-२०ची इन्कम टॅक्स भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर २०२० करण्यात आली आहे.

- Advertisement -

ही आहे नवी डेडलाईन

दरम्यान, यापूर्वी सरकारने ३१ जुलै रोजी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची मुदत वाढविली होती. मात्र, आता ही मुदत वाढ ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. तर आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी रिवाइज्ड आयकर रिटर्न दाखल करु इच्छित असाल तर यासाठीची अंतिम तारीख आता ३१ जुलै २०२० अशी करण्यात आली आहे. आयकर विभागाने ३० नोव्हेंबर २०२० रोजी सेल्फ अॅसेसमेंट टॅक्स १ लाखांपेक्षा कमी आणि मध्यम करदात्यांची टॅक्स भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२० केली आहे. मात्र, त्याचबरोबर १ लाखाहून अधिक देणे असणाऱ्यांच्या मुदतीत कोणताही बदल केलेला नाही.

प्राप्तिकर विभागात कर माफीसाठी 80 C, 80 D आणि 80 G अंतर्गत केलेल्या गुंतवणूकीची शेवटची तारीख ३१ जुलै २०२० करण्यात आली आहे. कोविड १९ मधील वाढत्या घटना लक्षात घेता सीबीडीटीने प्राप्तिकर अधिनियम १९६१ अंतर्गत या मुदत वाढवण्यात आली आहे. आयकर रिटर्न फॉर्मसहसा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सूचित केला जातो.

- Advertisement -

हेही वाचा – पावसाचे पाणी तुंबले! सफाईसाठी BJP नगरसेवकाने स्वतः केले ड्रेनेज साफ!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -