घरट्रेंडिंगगुडविन ज्वेलर्सचे मालक परदेशात पळण्याची शक्यता

गुडविन ज्वेलर्सचे मालक परदेशात पळण्याची शक्यता

Subscribe

गुडविनत्या मालकांना शोधण्सायाठी केरळला पोलिसांचे पथक रवाना

हजारेा गुंतवणूकदारांना कोटयावधी रूपयांचा चुना लावून फरार झालेल्या गुडविन ज्वेलर्सचा मालक सुनील कुमार आणि सुदीश कुमार यांचा तपास लावण्यात अजून पोलिसांना यश मिळालेलं नाही. त्यामुळे त्यांच्या केरळ येथील मुळगावी तपासण्यासाठी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक रवाना झाले आहेत. मात्र हे दोघे बंधू परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याबाबत खबरदारी घ्यावी अशीही मागणी होत आहे. ठाणे जिल्हयात गुडविनच्या शाखा उघडून ग्राहकांना जादा व्याज आणि भिसी योजना अशी प्रलोभने दाखवित ग्राहकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे गुडविनचे मालक सुनील कुमार आणि सुदीश कुमार यांच्या विरोधात डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाणे, अंबरनाथ येथील शिवाजीनगर तर ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाणे येथे सुमारे ९ कोटी रूपयांच्या फसवणूकीबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुडविन ज्वेलर्सच्या मालकांनी डोंबिवलीतील गाशा गुंडाळून पळ काढून तब्बल दहा दिवस उलटले. मात्र अजूनही त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. डोंबिवलीतील पलावा येथील प्लॅटमध्येही कोणीही राहत नसून, ते कुटूंबासह पळून गेले आहेत. डोंबिवलीतील घरातून आणि दुकानात पोलिसांनी पंचनामे केले. मात्र काही आढळून आलेले नाही. दुकानात अवघे ५० हजार रूपयांचे दागिने आढळून आले आहेत. त्यामुळे प्लॅनिंग करूनच ते पसार झाल्याचे दिसून येत आहे. डोंबिवली पेालिसांबरेाबरच, ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडून हा तपास सुरू आहे. सुनीलकुमार आणि सुदीश कुमार हे बंधू मुळचे केरळचे रहिवासी आहेत. हजारो गुंतवणूकदारांना फसवून त्यांनी कोटयावधी रूपयांची माया जमा केली आहे. केरळमध्ये त्यांनी कोटयावधी रूपयांची जमीन खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. केरळ येथे रिसॉर्ट उभारण्याचे काम सुरू असल्याचेही सुत्रांकडून समजले. त्यामुळे ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक तपासासाठी केरळला रवाना झाले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -