घरदेश-विदेशगुगल डुडलकडून ‘मोलिरे’ यांना मानवंदना

गुगल डुडलकडून ‘मोलिरे’ यांना मानवंदना

Subscribe

गुगलने आपले खास डुडल फ्रांसचे अभिनेते आणि कथालेखक मोलिरे यांना समर्पित केले आहे.

गुगलवर सातत्याने बदलणारे खास डुडल प्रत्येक नेटकऱ्यांच्या आकर्षणाचा बिंदू ठरत आहे. आज गुगलने आपले खास डुडल फ्रांसचे अभिनेते आणि कथालेखक मोलिरे यांना समर्पित केले आहे. आज गुगलने मोलिरे यांच्या ‘स्कूल फॉर वाइव्ज, ‘डॉन युआन, ‘द माइजर’ आणि ‘द इमॅजनरी इनवैलिड’ यांसारख्या नाटकांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मोलिरे यांना फ्रांस मधील शेक्सपियर सुद्धा संबोधले जाते.

यामुळे गुगलने तयार केले खास डुडल

मोलिरे यांचे वडील व्यावसायाने सूतार होते त्यांना परंपरागत व्यवसायाची आवड नव्हती त्यामुळे त्यांनी देखील व्यवसाय करण्यास स्पष्ट नकार दिला होता. १६४० साली त्यांनी रंगमंचाच्या दुनीयेत पाय ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच मोनिरे यांचे नाटक हे फक्त रंगमंचासाठीच आहे हे त्यांचे ठाम मत होते. मोलिरे यांच्या नाटकाचा पहिला प्रयोग पॅरिस येथे झाला होता. १६६० साली ‘द अफेक्टेड यांग लेडीज’ नाटकाचा प्रयोग झाला होता. मोलिरे नेहमी नाटकात व्यग्र असायचे. ‘द इमॅजनरी इनवैलिड’ हे त्यांचे अखेरचे नाटक होते आणि या नाटकाचा पहिला प्रयोग आज संपन्न झाला होता.

- Advertisement -

वाचा – गुगलसाठी बनवा ‘डुडल’ आणि जिंका ५ लाख


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -