घरदेश-विदेशस्पॅनिश चित्रकार बार्तोलोम एस्तेबान यांना गुगलची आदरांजली

स्पॅनिश चित्रकार बार्तोलोम एस्तेबान यांना गुगलची आदरांजली

Subscribe

जगप्रसिद्ध स्पॅनिश चित्रकार बार्तोलोम एस्तेबान मुरिलो यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त गुगलने डुडलच्या माध्यमातून त्यांना मानवंदना दिली आहे.

गुगलवर सातत्याने बदलणारे खास डुडल प्रत्येक नेटकऱ्यांच्या आकर्षणाचा बिंदू ठरत आहे. आज गुगलने आपले खास डुडल स्पॅनिश चित्रकार बार्तोलोम एस्तेबान यांना समर्पित केले आहे. जगप्रसिद्ध स्पॅनिश चित्रकार बार्तोलोम एस्तेबान मुरिलो (Bartolome Esteban Murillo) यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त गुगलनं त्यांना अभिवादन करणारे खास डुडल तयार केले आहे. बार्तोलोम एस्तेबान मुरिमो यांच्या कलेतून साकारलेल्या चित्राचं डुडल तयार करुन गुगलनं त्यांच्या कलेला सलाम केला आहे. सन १६५५ – ५० च्या दशकात बार्तोलोम यांनी रेखाटलेलं हे चित्र सध्या ‘वॉशिंग्टन नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट’ च्या चित्रसंग्रहात ठेवण्यात आले आहे.

google doodle celebrates bartolome esteban murillo 400 birth year anniversary

- Advertisement -

चित्रकार बार्तोलोम एस्तेबान यांच्याविषयी…

स्पॅनिश चित्रकार बार्तोलोम एस्तेबान यांचा जन्म स्पेनमधील सविले या शहरात झाला आहे. त्यांनी त्यांच्या काकांकडून चित्रकलेचे धडे घेतले होते. त्यांच्याकडून त्यांना चित्रकलेची आवड निर्माण झाली. बार्तोलोम यांनी स्थानिक जत्रेत त्यांच्या चित्रांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. धार्मिक चित्रांसाठी ते प्रसिद्ध होते. तसेच त्यांनी रेखाटलेल्या चित्रांमध्ये स्त्रियांची आणि लहान मुलांची चित्रं विशेष लोकप्रिय झाली आहेत. बार्तोलोम यांची अनेक चित्रे पीटर्सबर्गच्या संग्रहालयात जतन करण्यात आली आहेत. १६४५ मध्ये त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्ध मिळाली. स्पेनमधील एंडालुसियन या प्रांताचे ते रोजच्या जीवनावरती ते चित्र रेखाटायचे. या चित्रांमुळे ते प्रकाशझोतात आले होते. बार्तोलोम एस्तेबान यांचे ३ एप्रिल १६८२ मध्ये वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांचे निधनं झाले.


वाचा – गुगलसाठी बनवा ‘डुडल’ आणि जिंका ५ लाख

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -