गुगल डूडलने दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

या डूडलमध्ये भारताचा ऐतिहासिक वारसा आणि संस्कृतीचे दर्शन या डूडलच्या माध्यमातून दिसत आहे.

Mumbai

संपुर्ण देशभरात आज ७३ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर गुगल डूडलने भारत देशवासियांना या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुगल नेहमीच भारतातील महान लोकांच्या योगदानाची आठवण करून देण्यासाठी तसेच जगविख्यात असणाऱ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वांना अभिवादन करण्य़ासाठी गुगल हे सर्च इंजिन विशेष डूडल तयार करून सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.

त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना गुगल सर्च इंजिनने डूडलची विशेष कलात्मक पद्धतीने मांडणी केली आहे. या कलात्मक आणि रंगीत डूडलमध्ये भारताचा ऐतिहासिक वारसा आणि संस्कृतीचे दर्शन या डूडलच्या माध्यमातून दिसत आहे.

या महत्त्वपूर्ण दिनानिमित्त गूगल ने साकारलेल्या डूडलमध्ये संसदेची इमारत, राष्ट्रीय प्राणी वाघ , एलजीबीटी, भारतीय रेल्वे, हस्तकला यासोबतच चांद्रयान-२ मोहिमेची झलक पाहायला मिळत आहे. हे आकर्षक डूडल शैवालिनि कुमार यांनी डिझायन केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here