विक्रम साराभाईंना १००व्या जयंतीनिमित्त Googleचे अभिवादन!

विक्रम साराभाई हे भारतातील सगळ्या महान शास्त्रज्ञांपैकी एक

Mumbai

विक्रम साराभाईंना त्यांच्या १००व्या जयंतीनिमित्त गूगलने Google Doodle साकारले आहे. विक्रम साराभाई हे भारतातील सगळ्या महान शास्त्रज्ञांपैकी एक होते. त्यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ या दिवशी झाला होता. हे एक असे शास्त्रज्ञ होते की, ते युवा शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देऊन कोणतेही सहकार्य करायचे. इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च म्हणून ओळखल्या जाणार्‍या इस्रोची स्थापना त्यांनी १९६२ मध्ये केली होती.

१९१९ साली अहमदाबादमध्ये जन्मलेल्या विक्रम साराभाई यांनी केंब्रिज विद्यापीठातून डॉक्टरेट मिळविण्यापूर्वी गुजरात कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि भारतात परतल्यानंतर त्यांनी ११ नोव्हेंबर १९४७ रोजी अहमदाबाद येथे भौतिक संशोधन प्रयोगशाळेची स्थापना केली. त्यावेळी ते फक्त २८ वर्षांचे होते.

अनेक क्षेत्रांमध्ये आपले महत्त्वपुर्ण कार्य करणाऱ्या आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या मोठ्या व्यक्तींना गूगल आपले अनोखे गूगल साकारत त्यांना एकप्रकारचे अभिवादन करत असते.

विक्रम साराभाई यांच्या कारकीर्दीचा प्रवास

१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कॉस्मिक रे इन्वेस्टिगेशन इन ट्रापिकल लॅटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी ११ नोव्हेंबर १९४७ ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळेची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाऊल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली.

विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.

विक्रम साराभाई यांनी जागतिक किर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डॉ. साराभाई यांच्या प्रयत्नातूनच उभी राहिली. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखील डॉ. साराभाई यांनीच सुरू केली.

अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखील त्यांनी उभारली. भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह मानले जाणाऱ्या डॉ. विक्रम साराभाई यांनी ३० डिसेंबर १९७१ ला अखेरचा श्वास घेतला.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here