घरटेक-वेक'गुगल प्लस' कायमचं बंद, युजर्सचा डेटा वाऱ्यावर

‘गुगल प्लस’ कायमचं बंद, युजर्सचा डेटा वाऱ्यावर

Subscribe

युजर्सकडून Google+ चा अपेक्षित वापर न झाल्यामुळे अखेर गुगलने ही सेवा बंद करण्याचा निर्णय गुगलकडून घेण्यात आला आहे.

फेसबुकला टक्कर देण्यासाठी तयार करण्यात आलेली गुगल प्लसची सेवा आता कायमची बंद होणार आहे. नुकतीच गुगल कंपनीकडून याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ‘गुगल प्लस वापरणाऱ्या ५ लाख लोकांच्या खासगी अकाउंटमधील टेडा मध्यंतरी हॅक झाला होता. त्यामुळे ही साईट बंद करण्यापूर्वी त्यातील चुका आणि दोषांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे’, असा खुलासा गुगलने केला आहे. गुगलच्या दिग्गजांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, आता यापुढे युजर्ससाठी गुगल प्लस कायमस्वरुपी बंद होणार आहे. गुगल प्लस फेसबुकला टक्कर देण्यामध्ये असमर्थ ठरले होते. अशातच गुगल प्लसमध्ये झालेल्या डेटा हॅकिंगच्या प्रकरणानंतर आता आम्ही ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलने युजर्सचा आणि त्यांच्या गरजांचा पूर्ण विचार करुनच गुगल प्लसची निर्मीती केली होती. मात्र, प्रत्यक्षात युजर्सकडून गुगल पल्सचा हवा तितका वापर झाला नाही. त्यामुळे अखेर गुगलने Google+ सेवा बंद करण्यावर शिक्कामोर्तब केला आहे.


अद्भुत : तांदळाच्या वेफर्सपासून बनवली ‘मोनालिसा’ 

धमाल Video: जेव्हा घोडा अचानक ‘बार’मध्ये घुसतो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -