घरताज्या घडामोडीरेल्वे स्टेशनवर आता गुगलचं वायफाय नाही! कंपनीचा मोठा निर्णय!

रेल्वे स्टेशनवर आता गुगलचं वायफाय नाही! कंपनीचा मोठा निर्णय!

Subscribe

गुगलनं भारतातल्या ४०० रेल्वे स्थानकांवरची मोफत वायफाय सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे स्थानकांवर उपलब्ध असलेल्या फ्री वायफायचा वापर आपल्यापैकी अनेकांनी आजपर्यंत केला असेल. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर वायफाय वापर करणाऱ्यांचीच अधिक गर्दी झाल्याचे प्रकार देखील काही कमी नाहीत. मात्र, आता गुगलकडून भारतातल्या ४०० रेल्वे स्थानकांवर पुरवण्यात येणारी वायफाय सेवा बंद करण्यात येणार आहे. कंपनीकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. भारतात आता स्वस्त दरात आणि वेगवान इंटरनेट उपलब्ध झालं आहे. त्यामुळे आमचा हेतू साध्य झाला असून आता हे इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आता उपलब्ध झालेल्या स्वस्त आणि वेगवान इंटरनेटशी स्पर्धा करून सेवा अखंडितपणे सुरू ठेवणं अवघड असल्याचं देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

काय घडलंय गेल्या ५ वर्षांत?

२०१५मध्ये गुगलकडून भारतात इंटरनेट वापर वाढण्यासाठी एकूण ४०० रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा पुरवण्याच्या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. २०१८च्या जून महिन्यात हा प्रकल्प पूर्ण देखील झाला होता. ‘गुगल स्टेशन’ असं या प्रकल्पाचं नाव होतं. मात्र, दरम्यानच्या काळाच भारतातील इंटरनेटचे दर मोठ्या प्रमाणात स्वस्त झाले. जगभरात प्रति जीबी सर्वात स्वस्त दर असणाऱ्या देशांपैकी भारत एक झाला आहे. गेल्या ५ वर्षांत भारतात ९५ टक्क्यांनी इंटरनेटचे दर खाली आले आहेत, असं ट्रायचा २०१९चा अहवाल सांगतो. भारतीय सरासरी १० जीबी इंटरनेट प्रत्येक महिन्याला वापरतात. तसेच, आता इंटरनेट सेवा पुरवण्याच्या प्रक्रियेमध्ये लागणारी आधुनिक यंत्रप्रणाली उपलब्ध करून देणं हे आमच्या देशभरातल्या भागीदारांसाठी आव्हान ठरू लागलं आहे. त्यामुळेच गुगल स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं गुगलकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

- Advertisement -

महिना ८० लाख युजर्स!

२०१८पर्यंत गुगल स्टेशनवर सुमारे ८० लाख प्रति महिना वापरकर्ते रजिस्टर झाले होते. देशभरातल्या ४०० रेल्वे स्थानकांवरची ही आकडेवारी आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये देशातली कनेक्टिव्हिटी आणि सेवा सुधारली असल्याचं गुगलनं या पत्रकात नमूद केलं आहे.


हेही वाचा – गुगल मॅपमुळे पडला बर्फाच्या नदीत!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -