घरदेश-विदेशपृथ्वी दिवसः गूगलचे खास डूडल

पृथ्वी दिवसः गूगलचे खास डूडल

Subscribe

पृथ्वीवरील पर्यावरणाबाबत जागृती आणि त्याबद्दलती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस

जागतिक पातळीवरील होणाऱ्या घटना, दिनविशेष यासंदर्भात गूगल सर्च इंजिन नेहमीच डूडलच्या माध्यमातून त्या दिवसाला किंवा घटनेची आठवण साकारत असते. जागतिक स्तरावरील सर्वाधिक लोकप्रिय सर्च इंजिन असलेल्या गुगलने डूडल संदर्भातील वेगळेपण जपत आज जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने वैशिष्ट्यपूर्ण डूडल सादर केले आहे. २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणजेच पृथ्वी दिवस म्हणून संपूर्ण जगाभरात साजरा केला जातो.

असे आहे डूडल

Google Doodle

- Advertisement -

त्या निमित्याने गुगल या सर्च ईंजिनने आपल्या अनोख्या अंदाजामध्ये जागतिक वसुंधरा दिना निमित्त्याने एक डुडल तयार करत गूगल डूडलच्या माध्यमातून साकारलेले हे डूडल व्हिडिओ स्वरूपात आहे. या अनिमेटेड डुडलमध्ये पृथ्वीवरील विविध जीव दाखवण्यात आले आहेत. विविध जीव, प्राणीमात्रांचे घर असणाऱ्या या पृथ्वी दिनानिमित्त डुडलमध्ये जगातील सर्वात उंच झाड ते सर्वात लहान बेडूक आणि बरेच काही पाहायला मिळते. जागतिक वसुंधरा दिवसाचे सेलिब्रेशनचा अगदी जबरदस्त मार्ग गुगलने डुडलच्या माध्यमातून दाखवून दिला आहे.

- Advertisement -

पर्यावरण चळवळ उभारून ‘वसुंधरा दिन’ साजरा

उद्योगांनी आणि त्यांच्या उत्पादनांनी, तसेच त्यातून तयार झालेल्या आत्मघातकी मानवी स्वभावाना बदलण्यासाठी ७०च्या दशकात आधुनिक पर्यावरण चळवळ उभारण्यात आली. त्या स्थापनेचा दिवस ‘वसुंधरा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

जगातील १७५ देशांमध्ये साजरा

जागतिक स्तरावर सर्वप्रथम २२ एप्रिल १९७० रोजी अमेरिकेतील लोकप्रतिनिधी गेलार्ड नेल्सन यांनी पृथ्वीदिन साजरा केला होता. त्यानंतर १९९० सालापासून हा दिवस जगातील १७५ देशांमध्ये साजरा करण्यात येत आहे. पृथ्वीवरील पर्यावरणाबाबत जागृती आणि त्याबद्दलती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने २००९ साली २२ एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन म्हणून जाहीर करण्यात आला.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -