घरदेश-विदेशजिओच्या प्रेमापोटी MTNL, BSNL दिवाळखोरीत

जिओच्या प्रेमापोटी MTNL, BSNL दिवाळखोरीत

Subscribe

जिओच्या प्रेमापोटी बीएसएनएल आणि एमटीएनएल बंद होण्याच्या स्थित दिसून येत आहे.

‘महानगर टेलिफोन निगम लिमिटेड‘ आणि ‘भारत संचार निगम लिमिटेड’ या डबघाईला आलेल्या सरकारी कंपन्या बंद करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असून यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘जिओच्या प्रेमापोटी बीएसएनएल आणि एमटीएनएलचा बळी दिला जात आहे’, अशी जोरदार टीका नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच ‘या देशाची संपूर्ण संपत्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे दोन मित्र अदानी आणि अंबानीकडे सुपूर्द करत आहेत. त्यामुळे देशाच्या जनतेने हे कारस्थान ओळखून यांना घरी बसवण्याचा निर्णय घ्यायला हवा’, असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.

BSNL, MTNL चे कर्मचारी लटकले

‘महानगर टेलिफोन निगम लिमिटेड‘ आणि ‘भारत संचार निगम लिमिटेड’ या डबघाईला आलेल्या सरकारी कंपन्यांना तारण्यासाठी ७४ हजार कोटी रुपयांची सरकारकडे मागणी करण्यात आली होती. त्यावर केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल अशी लाखो कर्मचाऱ्यांनी अपेक्षा केली होती. मात्र, हा प्रस्ताव आता लटकलेला दिसत आहे. कारण अर्थ मंत्रालयाने एवढे मोठे पॅकेज देण्यास नकार दिला आहे. याउलट बीएसएनएल आणि एमटीएनएलला संजीवनी देण्यासाठी अन्य काही प्रस्ताव असतील, तर सादर करावे असा सल्ला दिला आहे. त्यामुळे बीएसएनएल आणि एमटीएनएल कंपन्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

- Advertisement -

बीएसएनएल आणि एमटीएनएल कंपन्या बंद झाल्या तर…

बीएसएनएल आणि एमटीएनएल या डबघाईला आलेल्या जर कंपन्या बंद केल्या तर मोठे नुकसान होणार आहे. जर या कंपन्या बंद झाल्या तर ९५ कोटींचा खर्च येणार आहे. या कंपन्या बंद करण्यापेक्षा त्यांना बेलआऊट पॅकेज देऊन त्या पुनरुज्जीवित करणे व्यवहार्य ठरेल, अशा दूरसंचार विभागाचा प्रस्ताव होता. त्यामध्ये एक लाख ६५ हजार कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हिआरएस), ४ जी स्पेक्ट्रम, भांडवली खर्च यांचा समावेश होता. सेवानिवृत्ती वय ६० वर्षांवरुन ५८ इतके केल्यास वेतनावरील खर्च कमी होईल, हा यामागील उद्देश आहे.


हेही वाचा – BSNLने लाँच केला ‘अभिनंदन’ प्लान

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -