घरदेश-विदेशचीनला आणखी एक झटका! चीनसह 'या' देशांतील Colour TV च्या आयातीवर बंदी!

चीनला आणखी एक झटका! चीनसह ‘या’ देशांतील Colour TV च्या आयातीवर बंदी!

Subscribe

केंद्र सरकारने ही बंदी ३६ सेमी ते १०५ सेमी पर्यंतच्या स्क्रीन आकार असणाऱ्या टीव्ही सेटवर लादली आहे.

गुरुवारी केंद्र सरकारने कलर टेलिव्हिजनच्या आयातीवर बंदी घातली आहे. चीनच्यासारख्या देशांतून देशांतर्गत उत्पादनाला (Domestic Manufacturing) चालना देणे आणि आवश्यक नसलेली वस्तूंची आयात कमी करणे या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) एका अधिसूचनेत म्हटले आहे की, कलर टेलिव्हिजनच्या आयात धोरणात सुधारणा करण्यात आली आहे. त्यांच्या आयात धोरणात बदल करून प्रतिबंधित श्रेणीत आणले आहे. ”

या देशातून Colour TV भारतात आयात होतो

प्रतिबंधित श्रेणी अंतर्गत एखादी वस्तू ग्राह्य मानली जात असेल तर त्याचा अर्थ असा आहे की, जो माल आयात करतो त्या व्यावसायिकाला वाणिज्य मंत्रालयांतर्गत डीजीएफटीकडून DGFT आयात परवाना घेणे अनिवार्य असते. चीन हा भारतातील कलर टीव्हीचा सर्वाधिक निर्यात करणारा देश आहे. त्यानंतर व्हिएतनाम, मलेशिया, हाँगकाँग, कोरिया, इंडोनेशिया, थायलंड आणि जर्मनीसारख्या देशांचा समावेश होतो.

- Advertisement -

केंद्र सरकारने ही बंदी ३६ सेमी ते १०५ सेमी पर्यंतच्या स्क्रीन आकार असणाऱ्या टीव्ही सेटवर लादली आहे. हा निर्बंध ६३ सेमी पेक्षा कमी स्क्रीन आकाराच्या लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (LCD) टीव्ही सेटवर देखील लागू असणार आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षांत सर्वाधिक आयात चीनकडून

सन २०१९-२० मध्ये एकूण ७८१ मिलियन डॉलर्स किंमतीचे टीव्ही सेट्स भारतात आयात केले गेले. यामध्ये सर्वाधिक हिस्सा व्हिएतनाम आणि चीनचा होता. गेल्या आर्थिक वर्षात भारताने चीनकडून ४२८ मिलियन डॉलर्सचे टीव्ही आयात केले होते. त्याच वेळी व्हिएतनामचा आकडा २९३ मिलियन डॉलर्स होता.


जगात आतापर्यंत ६ लाख ७६ हजारांहून अधिक मृत्यू; २४ तासात २ लाख ८० हजार…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -