घरदेश-विदेशकेंद्र सरकार करणार १ लाख टन कांद्याची आयात

केंद्र सरकार करणार १ लाख टन कांद्याची आयात

Subscribe

कांद्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने इतर देशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील काही दिवसांपासून किरकोळ बाजारात कांद्याची ७० ते १०० रुपये किलो दराने विक्री होता आहे. मागणी आणि पुरवठा यांच्यात संतुलन नसल्याने कांद्याची दरवाढ होत असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. त्यामुळे कांद्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने इतर देशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक लाख टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती अन्न आणि ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी ट्विट करुन दिली. सरकारी मालकीच्या एमएमटीसी या व्यापारी संस्थेमार्फत इतर देशातून कांदा आयात करण्यात येणार असून नाफेडमार्फत बाजारपेठेत कांद्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत बाजारपेठेत कांदा उपलब्ध होईल.

- Advertisement -

अतिवृष्टीमुळे कांद्याचे नुकसान

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी बाजारपेठेत चांगल्या कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -