Saturday, August 8, 2020
Mumbai
27 C
घर CORONA UPDATE तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित कोरोना पॉझिटिव्ह

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित कोरोना पॉझिटिव्ह

Tamilnadu
Governor of Tamil Nadu Banwarilal Purohit

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना कोरोनाची लागण झाली आहे. चेन्नई येथील कावेरी रुग्णालयाने याबाबतची माहिती दिली. कोरोनाची लक्षणं दिसत असल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पुरोहित यांना फारशी लक्षणे दिसत नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना घरीच आयसोलेट करण्यात आलं असून त्यांच्यावर डॉक्टरांचं पथक लक्ष ठेवून आहे. कावेरी रुग्णालयाने याबाबत मेडिकल बुलेटीन जारी करत ही माहिती दिली.

गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबतची माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमित शाह यांनी संपर्कात आलेल्यांना स्वत:ची चाचणी करुन घ्यायला तसंच आयसोलेट व्हायला सांगितलं आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here