Blast in Jammu : एकाचा मृत्यू तर ३२ जखमी; १८ संशयित ताब्यात

या हल्ल्यामध्ये २८ व्यक्ती जखमी झाल्या असून, स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Mumbai
granade attack on jammu bus stand,8 people injured
सौजन्य - ANI

जम्मू मधील एका बस स्थाकामध्ये आज दुपारच्या सुमारास ग्रॅनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून मोहम्मद शरिक असं त्याचं नाव आहे. याव्यतिरिक्त यामध्ये २८ लोकं जखमी झाल्याचं समजतंय. जम्मूचे आयजीपी एम.के.सिन्हा यांनी याची पुष्टी केली आहे. ताज्या माहितीनुसार, या हल्ल्याप्रकरणी १८ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. या हल्ल्याचा मास्टर माईंड कोण? याचा तपास घेण्याचं काम वेगाने सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


दरम्यान, जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळतआहे. बस स्थानक परिसरात करण्यात आलेल्या या ग्रॅनेड हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेमुळे स्टँड परिसरातील लोकांमध्ये तसंच स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचे आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी बसस्थानक आणि आसपासचा परिसर रिकामा केला असून, तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here