घरदेश-विदेशद्राक्ष निर्यात सुरू, पहिला कंटेनर जर्मनीला रवाना

द्राक्ष निर्यात सुरू, पहिला कंटेनर जर्मनीला रवाना

Subscribe

कोरोना, विपरित हवामान, अनिश्चित बाजारपेठ अशाही वातावरणात शेतकऱ्यांनी घेतले निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन

राकेश बोरा, लासलगाव

द्राक्षपंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झाला असून, द्राक्षाचा १२.४८० मॅट्रिक टन वजनाचा पहिला कंटेनर जर्मनीला रवाना झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी शेतकऱ्यांमध्ये आलेली मरगळ दूर करुन आता नव्या जोमाने हंगामासाठीची तयारी सुरु झालेली आहे. कोरोना, विपरित हवामान, अनिश्चित बाजारपेठ अशाही वातावरणात शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतले आहे.

- Advertisement -

द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. २०१८-१९ हंगामात तब्बल २ लाख ४६ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून २३३५ कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले. कृषीमाल निर्यात करताना प्रत्येक देशाच्या द्राक्षमण्यांचा आकार, द्राक्ष घडाचे वजन, साखरेचे प्रमाण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कीटकनाशकांचा अंश असे काही निकष आहेत. त्यांचे पालन करत भारतीय द्राक्षांनी परदेशात आपली ओळख निर्माण केली आहे. चालू हंगामातील निर्यात ही शुभसंकेत मानावे लागेल.

निर्यातीसाठी ४५ हजार द्राक्षबागांची नोंद

पोषक हवामानामुळे यंदा निर्यातक्षम, दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन वाढणार आहे. जानेवारी पासून द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. या वेळी ४५ हजारहून अधिक उत्पादकांनी निर्यातीसाठी नोंदणी केलेली आहे.

- Advertisement -

भारतीय द्राक्षांची चिलीशी स्पर्धा

निर्यातक्षेत्रात भारतीय द्राक्षांची अनेक वर्षांच्या मोनोपॉलिला मागील काही वर्षापासून चिली या देशाने आव्हान दिले आहे. मागील वर्षी चिलीच्या द्राक्षांनी चांगलाच भाव खाल्ला होता. त्याचा परिणाम भारतीय द्राक्षाच्या निर्यातीवर झाला होता. चिलीत द्राक्षाच्या ३० ते ३५ व्हरायटी आहेत.

भारतीय कृषी मालाला बांगलादेशात मोठी मागणी आहे. यासाठी केंद्र सरकारने वाहतूक खर्च आणि ड्युटी कमी केली पाहिजे. केंद्र सरकारने बांगलादेशची राजधानी ढाका येथे द्राक्ष निर्यातीसाठी रेल्वे उपलब्ध करून दिल्यास देशातील मोठ्या प्रमाणात द्राक्ष बांगलादेशमध्ये निर्यात केले जातील.
– कैलास भोसले, अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -