Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी स्मशानभूमीच्या शेडचे छप्पर कोसळून २४ जणांचा मृत्यू

स्मशानभूमीच्या शेडचे छप्पर कोसळून २४ जणांचा मृत्यू

एका स्मशानभूमीमधील शेडचे छप्पर कोसळून अपघातात २४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये घडली आहे.

Related Story

- Advertisement -

एका स्मशानभूमीमधील शेडचे छप्पर कोसळून अपघातात २४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये घडली आहे. तर अनेक जण जखमी झाले असून जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी दोन सदस्यांची चौकशी समिती गठीत केली आहे आहे. गाझियाबाद ग्रामीणचे पोलीस अधिक्षकांनी याबाबत माहिती दिली आहे.

नेमके काय घडले?

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मुरादनगर येथील स्मशानभूमीत उखलारसी गावातील एका व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आला होता. त्या दरम्यान, अचानक पाऊस पडायला लागला. या पावसापासून बचाव करण्यासाठी शेडच्या छप्परचा आधार घेतला. त्याच दरम्यान, अचानक शेडचे छप्पर कोसळले आणि त्याखाली अनेकजण दबले गेले. यामध्ये २४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर १७ ते १८ जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत. धक्कादायक बाब म्हणजे स्मशानभूमीच्या शेडचे छप्पर हे काही महिन्यांपूर्वीच नव्याने बांधण्यात आले होते.

NDRF टीमने याबाबत माहिती देताना धक्कादायक खुलासा केला आहे. स्मशानभूमीच्या छेडचे छप्पर कोसळण्यामागचे कारण समोर आले आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वीच नवीन छप्पर बांधण्यात आलं होतं. हे बांधण्यात आलेलं सामान हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं. त्यामुळे ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच उत्तर प्रदेश सरकारकडून या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबास दोन लाख रुपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे.


हेही वाचा – चीनचे अब्जाधीश जॅक मा दोन महिन्यांपासून बेपत्ता


 

- Advertisement -