Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश हेडफोन्स लावून गाणी ऐकणे बेतले तरुणाच्या जीवावर

हेडफोन्स लावून गाणी ऐकणे बेतले तरुणाच्या जीवावर

शेतात काम करताना अचानक झाला विजांचा कडकडात आणि...

Related Story

- Advertisement -

मोबाईल हे आजकालच्या तरुणाईचे व्यसन बनत आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर अनेक तरुणांना हेडफोन्स लावून गाणी ऐकण्याचा छंद असतो परंतु हाच छंद नोएडातील एका तरुणाच्या चांगलाच जीवावर बेतला आहे. शेतात काम करताना अचानक विजांचा कडकडात झाला आणि कानातील हेडफोनचाही ब्लास्ट झाला, यातच या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
‘आज तक’च्या माहितीनुसार, ग्रेटन नोएडातील जेवर येथे राहणारा गौतम नावाच्या तरुणाचा वीड पडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे वीज कोसळली तेव्हा गौतम हेडफोनवर गाणी ऐकत होता. वीज कोसळताच कानातील हेडफोनचा स्फोट झाला आणि यातच त्याचा मृत्यू झाला.

रविवारच्या दिवशी गौतम आपल्या शेतात काम करत होता परंतु यावेळी अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. पावसापासून वाचण्यासाठी गौतम शेतातील एका झोपडीत शिरला आणि पलंगावर गाणी ऐकत बसला. याच दरम्यान विजांचा मोठा कडकडात सुरु होता. यावेळी त्याच्या शेताजवळून पायवाटेने जाणाऱ्या एका व्यक्तीने गौतम झोपडीत पलंगावर पडल्याचे आणि त्याच्या तोंड, कानातून रक्त येत असल्याचे पाहिले. वीज कोसळल्याने कानातील हेडफोनचा ब्लास्ट झाला आणि यातच त्याच्या मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने म्हणे आहे. याप्रकरणी जेवर कोतवाली पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. गौतमचा नुकताच विवाह झाला होता. त्यामुळे त्याचा अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

- Advertisement -