घरदेश-विदेशकर्ज चुकवता न आल्यानं हमीदाराची आत्महत्या

कर्ज चुकवता न आल्यानं हमीदाराची आत्महत्या

Subscribe

विरेंदर सिंह जैन हे हमीदाराचं नाव असून २५ लाखांचं कर्ज फेडू न शकल्यामुळं त्यानं आत्महत्या करण्याचं उचलल्याचं स्पष्ट झालं आहे.

दिल्लीमध्ये एका ४५ वर्षीय इसमानं कर्ज न चुकवता आल्यानं आत्महत्या केली आहे. खरी बाब तर अजून वेगळी आहे. आपल्या मित्रासाठी हमीदार म्हणून राहिलेल्या या व्यक्तीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब घडली आहे. विरेंदर सिंह जैन असं या हमीदाराचं नाव असून २५ लाखांचं कर्ज फेडू न शकल्यामुळं त्यानं हे पाऊल उचलल्याचं स्पष्ट झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फायनान्सर आणि त्याचा मुलगा या हमीदाराला सतत धमकावत असल्यामुळं त्यानं ही टोकाची भूमिका उचलली. मिळालेल्या सुसाईट नोटमध्ये मित्राच्या रकमेची भरपाई न केल्यास, आपल्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी या फायनान्सर आणि त्याच्या मुलाकडून मिळाल्याचं हमीदारानं लिहून ठेवलं आहे.

फायनान्सरकडून मित्राला मिळवून दिलं कर्ज

दिल्लीतील मादीपूर कॉलनीतील विरेंदर सिंह जैनचं दुकान आहे आणि आपल्या ओळखीच्या व्यक्तिकडून त्याची भेट शरीफ खानबरोबर झाली. मागील महिन्यात खाननं २५ लाख रूपये कर्जासाठी संपर्क साधला. त्यावेळी जैन यांनी फायनान्सर दालचंद यादव याच्याशी त्याची भेट घडवून आणली. खाननं यादवकडून कर्ज घेतलं आणि तो गायब झाला. त्यानंतर यादवनं विरेंदर सिंह जैनला त्रास द्यायला सुरुवात केली. जैन परिवारनं ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, हमीदाराला फायनान्सरनं धमकी द्यायला सुरुवात केली होती. काही आठवड्यानंतर खानचा शोध घेण्याचा विरेंदरनं प्रयत्न केला आणि त्याला पकडून यादवकडे घेऊन गेला होता. यादव आणि खानदरम्यान तडजोड त्यानं घडवून आणली होती. त्यानंतर ४ लाख लगेच परत देण्यासाठी खान तयार झाला आणि बाकीचे पैसे नंतर देणार होता.

- Advertisement -

मित्र पुन्हा झाला गायब

विरेंदरचा भाऊ महिंदरच्या सांगण्यानुसार, या घटनेनंतर खाननं पुन्हा आपला मोबाईल बंद केला आणि गायब झाला. त्याचा कुठूनही पत्ता लागत नव्हता. त्यानंतर पुन्हा एकदा यादवनं विरेंदरला धमकी द्यायला सुरुवात केली. त्याच्या मुलीचं अपहरण करून मारून टाकण्याची धमकी दिल्यानंतर विरेंदरनं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -