गुजरातमधील कच्छ येथील मानकुवा परिसरात रिक्षा आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
Gujarat: 7 dead and 10 injured after an auto collided with a truck near Mankuwa area of Kutch, earlier today. More details awaited. pic.twitter.com/1VyhpMBwzr
— ANI (@ANI) July 15, 2019
असा घडला अपघात
गुजरातमधील कच्छ येथील मानकुवा परिसरातील महामार्गावर आज सकाळी रिक्षा आणि ट्रक यांची धडक झाली. या भीषण धडकेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. हा अपघात एवढा भयंकर होता की या अपघातात रिक्षाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. या घटनेची माहिती एएनआय वृत्त संस्थेने दिली आहे.