Video: गुजरातमधील प्लास्टिक कारखान्याला भीषण आग; नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार अग्निशमन विभागाकडून सध्या ही भीषण आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

गुजरातमधील वलसाड येथे असलेल्या प्लास्टिक कारखान्यात भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, दिवाळीच्या दिवशी शनिवारी वलसाडमधील प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या विभागाची वाहने घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य सुरू केले.

दरम्यान, स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार अग्निशमन विभागाकडून सध्या ही भीषण आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्निशमन विभागाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली माहिती नाही.

वृत्तसंस्था एएनआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण कारखाना पेटलेला असल्याचे दिसून आले आहे. ही आग मोठ्या स्वरूपाची असल्याने त्याच्या भीषण ज्वाळा आणि धूराचे लोट आजूबाजूच्या परिसरात पसरले आहेत. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या क्षणी आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहे.


अयोध्येत ६ लाख दिवे लावून दीपोत्सव साजरा;‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’मध्ये नोंद!