Corona: गुजरातमध्ये यंदा नवरात्रीत गरबा-दांडियाचा जल्लोष नाही; गुजरात सरकारची नियमावली जाहीर

राज्यातील सध्याची कोरोना विषाणूची परिस्थिती पाहता गुजरात सरकारने नवरात्र आणि त्यानंतर येणाऱ्या सण उत्सवासाठी नियमावली तयार केली आहे. १५ ऑक्टोबर २०२० पासून राज्यात हे नियम लागू होणार

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने सणांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. गुजरात सरकारने कोरोना विषाणूची वाढता प्रादुर्भाव बघता शुक्रवारी सण-उत्सवासाठी नियमावली जारी केली आहे. नवरात्री गरबा, दसरा, दिवाळी, गुजराती नवीन वर्ष आणि शरद पौर्णिमाच्या दिवशी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमासाठी नियमावली जारी केली आहे.  नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीची पूजा करून घटस्थापना होते आणि प्रारंभ होतो तो नवरात्रौत्सवाला.या दिवसापासून सुरूवात होते ती गरबा-दांडियाच्या जल्लोषाची. पण गुजरात सरकारने कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहून यंदा नवरात्रीमध्ये गरबा खेळण्यावर बंदी घातली आहे.

१५ ऑक्टोबरपासून राज्यात हे नियम लागू

नवरात्री उत्सावाला आवघे आठ दिवस बाकी असतानाच गुजरात सरकारने ही नियमावली जाहीर केली आहे. सध्या राज्यात असणारी कोरोना संदर्भातील परिस्थिती लक्षात घेता गुजरात सरकारने नवरात्र आणि त्यानंतर येणाऱ्या सण उत्सवासाठी नियमावली तयार केली आहे. १५ ऑक्टोबर २०२० पासून राज्यात हे नियम लागू होणार आहेत. गुजरात सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार, नवरात्रीदरम्यान राज्यात कुठेही गरब्याचे आयोजन करण्यावर बंदी आहे. नवरात्रीमध्ये सार्वजनिक ठिकाणी देवीच्या मूर्तीची स्थापना आणि पूजा करु शकता. पण, फोटो किंवा मूर्तीला स्पर्श करणे आणि प्रसाद वाटण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच स्थानिक प्रशासानच्या संमतीनंतर देवीच्या मूर्तीची स्थापना करता येईल.

या गोष्टींना असणार नवरात्रोत्सावत बंदी

नियमांनुसार, कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांमध्ये सहा फूटांचे अंतर असावे. शिवाय मास्कचा वापरही बंधनकारक करण्यात आला आहे. कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवायची असल्यास सॅनिटाजर किंवा हँडवॉश जवळ असावे. कार्यक्रमादरम्यान थुंकल्यास मोठा दंड आकरण्यात येणार आहे. रॅली, रावण दहनाचा कार्यक्रम, शोभा यात्रा आणि रामलीलासारख्या कार्यक्रमात २०० पेक्षा जास्त लोक उपस्थित राहू शकत नाहीत. तसेच या कार्यक्रमासाठी फक्त एक तासांचा वेळ देण्यात आला आहे. तसेच गर्भवती महिला आणि इतर आजार असणाऱ्यां व्यक्तीना ६० वर्ष किंवा त्यापेक्षा आधिक वय असणाऱ्यांना आणि १० वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या लहानग्यांना कार्यक्रमात येण्यास परवानगी नाही.


Nobel Peace Prize: ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ला मिळाला २०२० चा नोबेल शांतता पुरस्कार