घरताज्या घडामोडी'भूत'बाधा झाल्याचा संशय; सूनेला नवऱ्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यापासून केले दूर

‘भूत’बाधा झाल्याचा संशय; सूनेला नवऱ्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यापासून केले दूर

Subscribe

गुजरातच्या गांधीनगर येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. एक व्यक्तिने सूनेला तिच्या नवऱ्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यापासून दूर करण्यात आले होते. या व्यक्तिचे म्हणणे होते की, सूनेच्या शरीरात भूत किंवा आत्म्याची सावली आहे, जी शरीरसंबंधामुळे त्याच्या मुलाच्या शरीरात जाऊ शकते. सून वडोदरा येथे राहणारी असून तिने गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी तक्रार दाखल केली आहे.

या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या सासऱ्याने तिला पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्यापासून लांब ठेवले होते. याचा जाब विचारल्यानंतर तिला सांगण्यात आले की, तिच्या शरीरात आत्मा असून शरीरसंबंध ठेवल्यास तो आत्मा तिच्या पतीच्या शरीरात जाऊ शकतो. जेव्हा सुने सासऱ्याच्या या थोतांडाला विरोध केला, तेव्हा तिला सासरच्या लोकांकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर पीडित महिलेने पोलीस स्टेशन गाठून सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सासरच्या लोकांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला.

- Advertisement -

फेब्रुवारी २०२० रोजी या दाम्पत्याने रजिस्टर पद्धतीने लग्न केले होते. लग्न झालेली ४३ वर्षीय महिला वडोदरा जिल्ह्यातील अलकापुरी येथे राहण्यास आहे. लग्नानंतर ती गांधीनगर येथे पतीच्या घरी राहायला आली होती. लग्नानंतर सासऱ्यांनी तिच्या शरीरात आत्मा असल्याचेसांगत पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास तिच्यावर बंदी घातली. या गोष्टीला विरोध केल्यानंतर सासऱ्यांनी मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचा आरोप या महिलेने तक्रारीत केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -