घरदेश-विदेशगुर्जर आंदोलनामुळे पश्चिम रेल्वेच्या १८ रेल्वे रद्द

गुर्जर आंदोलनामुळे पश्चिम रेल्वेच्या १८ रेल्वे रद्द

Subscribe

आरक्षणाच्या मागणीसाठी राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुर्जर समाजाचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले होते. सवाई माधवपूर येथे आंदोलक रेल्वे ट्रॅकवर आंदोलनासाठी उतरल्यामुळे उत्तर – पश्चिम रेल्वे मात्र चांगलीच विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेला तब्बल १८ रेल्वे रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. १५ फेब्रुवारी पर्यंत तब्बल १५ रेल्वे रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर २१ रेल्वेंच्या मार्गात बदल करण्यात आलेला आहे. गुर्जर समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावे, यासाठी चार दिवसांपासून राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरु आहे.

- Advertisement -

गुर्जर समाजाच्यावतीने आज जयपूर ते आग्रा राष्ट्रीय महामार्ग – ११ अडवण्यात आला आहे. रविवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागले त्यानंतर ढोलपूर आणि करोली जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांना या दोन्ही जिल्ह्यात १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करावी लागली होती. शुक्रवार पासून या आंदोलनाला सुरुवात झाली असून आतापर्यंत २५० हून अधिक रेल्वे यामुळे प्रभावित झालेल्या आहेत.

पश्चिम रेल्वेने आता ट्विट करत रद्द केलेल्या सर्व गाड्यांचा तपशील दिलेला आहे.

- Advertisement -

गुर्जर समाजाचे नेते किरोडी सिंह बैंसला यांनी सांगितले आहे की, आम्हाला नोकरी आणि शिक्षण संस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण हवे आहे. गुर्जर समाजाने रायका रेबाडी, गडिया, लोहारा, बंजारा आणि गडरिया या जातींना देखील आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मागणी केली आहे. “जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही रेल्वे ट्रॅक मोकळा करणार नाही”, अशी भूमिका किरोडीसिंह यांचे पुत्र विजय सिंह यांनी घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -