घरताज्या घडामोडीH1B Visa : अमेरिकेचा मोठा निर्णय; भारतीयांना मोठा फटका!

H1B Visa : अमेरिकेचा मोठा निर्णय; भारतीयांना मोठा फटका!

Subscribe

जगभरात कोरोनाचा धुमाकूळ अजूनही सुरू असताना अमेरिकेत मात्र निवडणुकांचे बिगुल वाजत आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (President of America Donald Trump) पुन्हा एकदा त्या पदावर हक्क सांगत प्रचार करत आहेत. तर दुसरीकडे जो बिडेन देखील तोडीस तोड प्रचार करत आहेत. पण अमेरिकेत प्रचाराचा ज्वर चढत असताना त्याचा भारतीयांना मात्र भलताच त्रास होणार आहे. विशेषत: अमेरिकेत नोकरीसाठी असणाऱ्या अनिवासी भारतीयांना आणि H1B Visa (एचवन व्हिसा) वर काम करणाऱ्या भारतीयांना या निवडणुकीचा फटका बसणार आहे. आधीच कोरोनामुळे अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय बेरोजगार झाले असून त्यातल्या अनेकांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. आता त्यात नव्या संकटाची भर पडली आहे. अमेरिकी प्रशासनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे भारतीयांचं अमेरिकेत काम करणं कठीण होऊन बसणार आहे.

अमेरिकेतल्या बेरोजगारांसाठी घेतला निर्णय!

अमेरिकेत सध्या कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली आहे. एका आकडेवारीनुसार आजघडीला अमेरिकेत तब्बल ७ कोटींहून जास्त नागरिक कोरोना काळात बेरोजगार झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत काम करणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात तिथे नाराजी आणि काही ठिकाणी तर असंतोषाचं वातावरण आहे. त्यातच अमेरिकेत मोठ्या संख्येने असणाऱ्या भारतीयांना त्याचा अधिक फटका बसत आहे. त्यामुळे नुकतंच कोरोनाच्या काळात अमेरिकन सरकारने H1B व्हिसा देण्याची प्रक्रिया पुढील निर्णय होईपर्यंत स्थगित केली होती. त्यात आता या नव्या निर्णयाची भर पडली आहे.

- Advertisement -

ट्रम्प प्रशासनाचा व्हिसा धोरणाबाबत प्रचार

अमेरिकेतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रशासनाने अमेरिकी मतदारांना आकर्षित करण्यासाठी H1B व्हिसासंदर्भातले नियम अधिक कठोर केले आहेत. यातून ट्रम्प प्रशासन अमेरिकी नागरिकांच्या हितसंबंधांचा किती विचार करतंय, हे दाखवण्याचा प्रयत्न ट्रम्प प्रशासन करताना दिसत आहे. नव्या निर्णयानुसार आता भारतीयांना नोकरीवर ठेवणाऱ्या अमेरिकी कंपन्यांना विशेषज्ज्ञ अर्थात Specialty संदर्भात अधिक सविस्तर आणि नेमकी मागणी ठेवावी लागणार आहे आणि तेवढ्याच कर्मचाऱ्यांना त्याच कामासाठी कामावर ठेवता येणार आहे. या निर्णयामुळे अमेरिकी नागरिकांचा रोजगार कायम ठेवण्यासाठी आणि अमेरिकी नागरिकांसाठीच नवा रोजगार निर्माण करण्यासाठी मदत होणार असल्याचा प्रचार ट्रम्प प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

यासंदर्भातली आकडेवारी पाहिली असता…

२०१८मध्ये अमेरिकेत H1B व्हिसासाठी तब्बल ४ लाख १९ हजार अर्ज आले. त्यातले ७३.९ टक्के म्हणजेच तब्बल ३ लाख ९ हजार अर्ज हे एकट्या भारतातून आले होते. त्यापाठोपाठ ११.२ टक्के म्हणजेच ४७ हजार १७२ अर्ज चीनमधून आले होते. त्यामुळे एच वन व्हीसाचे नियम कठोर केल्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका भारताला बसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -