घरदेश-विदेशकर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी एच. डी कुमारस्वामी

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी एच. डी कुमारस्वामी

Subscribe

जनता दलाचे नेते एच डी कुमारस्वामी यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर त्यांच्यासोबत जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी कुमारस्वामी आणि परमेश्वर यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. कर्नाटकच्या विधानभवन परिसरात हा शपथविधी सोहळा पार पडला. आज फक्त दोनच नेत्यांचा शपथविधीचा कार्यक्रम झाला. तर २५ मे रोजी विधानसभेत बहुमताची चाचणी झाल्यानंतर इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.

या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, बसपा अध्यक्षा मायावती, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, माकपचे नेते सिताराम येचुरी या नेत्यांनी उपस्थिती लावली. या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना देण्यात आले होते. मात्र पालघर निवडणुकीमध्ये व्यस्त असल्याने ते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नाही. मात्र त्यांनी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

कुमारस्वामी सरकार उद्या बहुमत सिध्द करायचे आहे त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. त्यानंतर २५ मे ला बहुमत चाचणी झाल्यावर इतर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. आज झालेल्या शपथविधी सोहळ्याला केंद्रातील विरोधी पक्षातील अनेक नेते एकत्र आले होते. त्यामुळे या सोहळ्याच्या निमित्ताने भाजपविरोधकांची एकजूटही पाहायला मिळाली.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -