घरदेश-विदेशहाफीज सईद उतरला निवडणुकीच्या रिंगणात

हाफीज सईद उतरला निवडणुकीच्या रिंगणात

Subscribe

कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि जमात-उल-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद आता निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. 25 जुलै रोजी पाकिस्तानामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अल्ला-ओ-अकबर तेहरीक या पक्षाच्या माध्यमातून सईदने २०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत.

कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी आणि जमात-उल-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद आता निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. सईदने २१ जुन रोजी अल्ला-ओ-अकबर तेहरीक या पक्षाची स्थापना केली असून पक्षाचा प्रचार करण्यासाठी सईद आता निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. जुलै महिन्यात पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुका पार पडणार आहे. यामध्ये अल्ला-ओ-अकबर तेहरीक या हाफीज सईदच्या पक्षाने जवळपास २०० उमेदवारांना निवडणुकीच्या रिगणात उतरवले असून २५ जुलै रोजी पाकिस्तानमध्ये निवडणुका होणार आहेत. या २०० उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आता हाफीज सईदने निवडणुकीच्या प्रचारात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, सईदला मिली मुस्लिम लीग अर्थात एमएमएल या पक्षाने देखील पाठिंबा दिला आहे. एमएमएल हा पक्ष देखील अल्ला -ओ- अकबर तेहरीक या पक्षाशी संबंधित आहे.

पक्ष नोंदणीस निवडणूक आयोगाचा नकार

सईदने मिली मुस्लिम लीगची ऑगस्ट २०१७ मध्ये स्थापना केल्यानंतर १३ जून २०१८ रोजी पक्षांच्या नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला. निवडणूक आयोगाने हा अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, जमात-उल-दावाने २०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. अल्ला-ओ-अकबर तेहरीक या पक्षाच्या माध्यमातून हाफीज सईदने स्थानिक स्वराज्य संस्थासह राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुका लढण्याचा देखील निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

एमएमएल आणि जमात-उल-दावा एकाच नाण्याचा दोन बाजू

मिली मुस्लिम लीग अर्थात एमएमएल आणि जमात-उल-दावा या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे युनायटेड स्टेटने ३ एप्रिल रोजी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तर, २०१४मध्ये हाफीज सईदला आंतरराष्ट्रीय म्हणून देखील घोषित करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -