घ्या, हेच बाकी होतं आता! इम्युनिटी वाढवणारं Ice Cream बाजारात दाखल

हळद आणि च्यवनप्राश फ्लेव्हरचं आइस्क्रिम कोरोना महामारी दरम्यान केले लाँच

Karnataka
प्रातिनिधीक फोटो

लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आइस्क्रिम हा पदार्थ आवडत असतं. तुम्ही आइस्क्रिमचे अनेक फ्लेव्हर्स पाहिले असतील आणि ते चाखले देखील असतील. मात्र, तुम्ही हळद आणि च्यवनप्राश असं वेगळं फ्लेव्हरचे आइस्क्रिम खाल्ले आहे का? नाही न…

कर्नाटक मधल्या डेरी डे या कंपनीने हळद आणि च्यवनप्राश फ्लेव्हरचं आइस्क्रिम कोरोना महामारी दरम्यान लाँच केले आहे. औषधी गुणधर्म असलेली हळद भारतातील मसाल्याचा एक भाग आहे, तर च्यवनप्रश हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी आयुर्वेदिक सप्लिमेंट मानले जाते. त्यामुळे या दोन्ही घटकांचा वापर करून कर्नाटकात इम्युनिटी वाढवणारं Ice Cream बाजारात दाखल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हळदीचे फ्लेव्हर आइस्क्रिममध्ये हळद, काळी मिरी आणि मध या घटकांचा वापर करण्याच आला आहे. तर च्यवनप्राश फ्लेव्हर असणाऱ्या आइस्क्रिममध्ये इतर घटकांसह खजूर टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे वेगळं आइस्क्रिम लॉंच करणाऱ्या डेरी चे सह संस्थापकांनी सांगितले की, आइस्क्रिम इंडस्ट्रिमध्ये सर्व प्रथमच हळदीचा वापर करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरस दरम्यान कोरोनावर उपचार म्हणून अनेक देश कोरोनावर औषध किंवा लस तयार करण्यात गुंतलेले आहेत. अशा परिस्थितीत इम्युनिटी वाढवणारं Ice Cream बाजारात दाखल झाल्याने एकच चर्चा सुरू झाल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी या नव्या हळद आणि च्यवनप्राश फ्लेव्हर असणाऱ्या आइस्क्रिमवर टीका केली तर काहींनी कौतुक देखील केले आहे. दरम्यान सोशल मीडियावर या नव्या फ्लेव्हर्सची आइस्क्रिम ग्राहकांच्या पसंतीस पडणार नाही, अशा काही प्रतिक्रिया उमटू लागल्याचेही दिसतंय.


१० तासांच्या शिफ्टनंतर असा झाला डॉक्टरचा हात; जिल्हाधिकाऱ्यांनीही केला सलाम!

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here