घरदेश-विदेशधक्कादायक! 'हाफकीन' संचालिकेचा ई-मेल हॅक 

धक्कादायक! ‘हाफकीन’ संचालिकेचा ई-मेल हॅक 

Subscribe

अज्ञात हॅकरने त्यांची व्यक्तिगत माहिती मिळवून त्यांच्या नावाचा ई-मेल आयडी तयार केला होता आणि त्यावरुन थेट संस्थेच्या मेलवर हा बोगस मेल पाठवला होता.

बड्या खासगी कंपन्यांना लक्ष्य करणारे ‘ई-मेल हॅकर’ यांनी आता शासकीय संस्थांनाही लक्ष्य करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या हॅकर्सने हाफकीन महामंडळाच्या थेट संचालिकांचाच ई-मेल हॅक करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महामंडळाच्या  व्यवस्थापकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. मागील काही दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाची तक्रार भोईवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात हॅकरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हाफकीन जीव औषधे निर्माण महामंडळातील एका विभागाच्या संचालक पदावर सनदी अधिकारी संपदा मेहता आहेत. या विभागातील अकाऊंट  विभागाचे व्यवस्थापक राजेंद्र जोशी यांनी महामंडळाचा अधिकृत ई-मेल तपासला असता, त्यात संचालिका मेहता यांच्या ई-मेल आयडीवरून आलेला मेल दिसला, ज्यामध्ये ‘संपदा मेहता या मिटींगमध्ये असून, आरटीजीएसद्वारे ४,८०,३०० रुपये त्यांना पाठवावेत, या ई-मेलला ई-मेलद्वारेच उत्तर द्यावे’, असे नमूद करण्यात आले होते. हा प्रकार संशयित वाटल्याने जोशी यांनी या मेलची एका कागदावर प्रिंट काढून संचालिका मेहता यांना दाखवली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

अज्ञात हॅकरने त्यांची व्यक्तिगत माहिती मिळवून त्यांच्या नावाचा ई-मेल आयडी तयार केला होता आणि या बनावट ई-मेल आयडीवरून थेट संस्थेच्या मेलवर हा बोगस मेल पाठवला होता. याबाबत अधिकृत प्रतिक्रिया घेण्यासाठी संचालिका मेहता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

अज्ञात हॅकरने हाफकीन महामंडळाच्या संचालिकाचा ई -मेल हॅक करून त्यांच्या मेलवरील सर्व डेटा चोरला, त्यानंतर त्यांचा बनावट ईमेल आयडी तयार केला होता, त्या आयडीवरून हॅकरनेे ४,८०,३०० रुपये मागितले. परंतु, अधिकार्‍यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला.
– रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोईवाडा 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -