देश कोरोनापेक्षा धार्मिक कट्टरता, प्रखर राष्ट्रवाद या महामारीने ग्रस्त – हमीद अन्सारी

hamid ansari says india has a victim of the epidemic of religious bigotry and aggressive nationalism before corona

कोरोना ही एक महामारी आहे. परंतु, याआधीच आपला देश धार्मिक कट्टरता, प्रखर राष्ट्रवाद या दोन महामारींनी ग्रस्त आहे, असे विधान माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी केले आहे. काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या ‘द बॅटल ऑफ बिलॉन्गिंग’ या नव्या पुस्तकाच्या डिजिटल प्रकाशानावेळी बोलताना देशातील वाढत्या धार्मिक कट्टरतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. देश ‘प्रकट आणि अप्रकट’ विचार आणि विचारधारांमुळे धोक्यात दिसतोय जे ‘आम्ही आणि ते’च्या काल्पनिक मुद्यांवरून देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोना संकटापूर्वी भारतीय समाजाला धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवाद या दोन कोरोनापेक्षाही गंभीर आजारांना बळी पडला आहे, असे हमिद अन्सारी म्हणाले.

आज आपला देश कोरोना विषाणूच्या महामारीशिवाय आणखी दोन महामारींचा सामना करत आहे. कोरोनापेक्षा या महामारींचा धोका अधिक दिसत आहे. भारताला धार्मिक कट्टरता आणि प्रखर राष्ट्रवादाने ग्रासले आहे. मात्र या दोघांच्या तुलनेत देशभक्ती अधिक सकारात्मक संकल्पना आहे. देशप्रेम हे सैन्य किंवा सांस्कृतिकदृष्ट्या जास्त संरक्षणात्मक आहे. देश अशा विचारधारेच्या धोक्यात दिसत आहे, जी “आम्ही आणि ते” या काल्पनिक श्रेणीच्या आधारावर विभाजनता प्रयत्न करते, असे अन्सारी म्हणाले. मोदी सरकारवर निशाणा साधताना हमिद अन्सारी म्हणाले की, चार वर्षांच्या अल्प कालावधीत भारताने एक उदार राष्ट्रवादच्या पायाभूत दृष्टीकोनाकडून सांस्कृतिक राष्ट्रवादीच्या राजकीय गृहितकापर्यंत प्रवास केलाय आणि त्याने सार्वजनिक क्षेत्रात मजबुतीने ताबा मिळवलाय, असे म्हणत हमिद अन्सारी यांनी देशाच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे.