घरदेश-विदेशहनुमानजी भाजपच्या लंकेचं दहन करतील...

हनुमानजी भाजपच्या लंकेचं दहन करतील…

Subscribe

'निवडणुकीतील पराभवावरुन धडा घेऊन जर भाजपचे वाचाळ नेते वेळीच गप्प बसले नाहीत, तर हनुमान भाजपच्याच लंकेचे दहन करतील', अशी टीका राज बब्बर यांनी भाजपवर केली आहे.

भगवान हनुमान कोण होते, त्यांची जात आणि त्यांचा धर्म काय होता? या मुद्द्यांवरुन मगील अनेक दिवस राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांपैकी कुणी हनुमानाला दलित म्हटलं आहे तर कुणी हनुमान जैन आणि मुसलमान असल्याचा दावा केला आहे. त्यापाठोपाठ आता काँग्रेस नेते आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर, यांनी याच मुद्द्यावरुन भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. हनुमानाला आजपर्यंत दलित, वंचित, मुस्लिम ठरवणाऱ्या भाजपला तीन राज्यांमध्ये आपली सत्ता गमवावी लागली आहे. त्यामुळे ‘निवडणुकीतील पराभवावरुन धडा घेऊन जर भाजपचे वाचाळ नेते वेळीच गप्प बसले नाहीत, तर हनुमान भाजपच्याच लंकेचे दहन करतील’, अशी टीका राज बब्बर यांनी भाजपवर केली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमानाला दलित आणि आदिवासी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर हनुमान नक्की कोणत्या धर्माचे ? या वादाला प्रारंभ झाला.

लखनऊमध्ये पत्रकारांशी बोलताना राज बब्बर यांनी याच ‘हनुमान’ वादाचा परखड शब्दांत समाचार घेतला. या मुद्दावरुन भाजपला टार्गेट करत ते म्हणाले की, ‘भाजपला काही महिन्यातंच पराभव सहन करावा लागला. त्यात भर म्हणून शुक्रवारी भाजपचे आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमानाला मुस्लिम म्हटले. तर भाजपच्याच लक्ष्मी नारायण यांनी हनुमान जाट होता असं वक्तव्य केलं. याला जोड म्हणून चेतन चौहान यांनी हनुमान खेळाडू असल्याचा दावा केला.’ अशाप्रकारे हनुमानाची जात, धर्म काढणं आणि स्वत:च्या सोयीनुसार वेगवेगळी विशेषणं देणे वेळीच थांबवलं नाही, तर हनुमान भाजपचीच लंका जाळून टाकेल, अशी परखड टीका बब्बर यांनी केली.

- Advertisement -

नसीरुद्दीन शाहला पाठिंबा

याशिवाय राज बब्बर यांनी यावेळी अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिकेचेदेखील समर्थन केले. बुलंद शहरातील हिंसाचाराबाबत शाह यांनी व्यक्त केलेली भीती आणि त्यांनी केलेलं वक्तव्यात काही चूक नाही, असं बब्बर यावेळी म्हणाले. शाह हे एक जबाबदार अभिनेते आणि त्यासोबतच जबाबदार वडीलही आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलांविषयी वाटणारी चिंता व्यक्त करण्याचाही अधिकार नाही का? असा सवाल राज बब्बर यांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -