घरट्रेंडिंगअरे व्वा: 'या' पायलटने गावकऱ्यांना घडवली विमानाची सफर

अरे व्वा: ‘या’ पायलटने गावकऱ्यांना घडवली विमानाची सफर

Subscribe

गावातील ज्येष्ठ नागरिकांना विमान प्रवास करणे सहज शक्य नसल्यामुळे, विकासने पायलट होताच विमान प्रवासासाठी खास ७० वर्षाहून अधिक वय असलेल्या गावकऱ्यांची निवड केली.

एखाद्या लहानशा गावातून आणि सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या तरूणाने भविष्यात मोठं यश संपादन केलं, तर त्याचं कौतुक साहाजिकच सर्वांना असणार. मात्र, गाववाल्यांकडून मिळालेल्या सहकार्याची आणि पाठिंब्याची परतफेड म्हणून त्या व्यक्तीने त्यांच्यासाठी काही करुन दाखवले, तर ती अधिक कौतुकाची बाब ठरेल. काहीस असाच प्रकार घडलाय हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील सारंगपूर गावामध्ये. सारंगपूर गावात राहणाऱ्या विकास ज्ञानी या तरूणाला लहानपाणापूसनच पायलट बनायचे होते. विकास पायलट होण्याची तयारी करत असताना त्याने म्हटले होते, की ‘भविष्यात जर मी पायलट झालो, तर मी गावकऱ्यांना नक्की विमानातून फिरवून आणेन.’ आज खराखुरा पायलट झाल्यावर विकासने आपले म्हणणे खरे करुन दाखवले आहे. पायलट बनलेल्या विकासने खरोखरंच आपल्या गावातील ज्येष्ठ लोकांना विमानाची सफर घडवली आहे. विकासाच्या या अनोख्या परतफेडीचे सध्या सोशल मीडियावरुन जोरदार कौतुक होत आहे. दरम्यान विकासने दिलेल्या या भन्नाट सरप्राईजमुळे गावकरीही खूप खुश झाले आहेत. गावकऱ्यांनी केलेल्या विमानप्रवासाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


#Metoo ला आमिर खानचा पाठिंबा: सोडून दिला ‘हा’ चित्रपट

- Advertisement -

गावातील ज्येष्ठ नागरिकांना विमान प्रवास करणे सहज शक्य नसल्यामुळे, विकासने पायलट होताच विमान प्रवासासाठी खास ७० वर्षाहून अधिक वय असलेल्या गावकऱ्यांची निवड केली. विकास स्वत: चालवत असलेल्या या फ्लाईटमधून गावकऱ्यांनी चंदीगढ ते अमृतसर असा प्रवास केला. विमान प्रवासानंतर या सगळ्यांनी सुवर्णमंदिर, जालियनवाला बाग आणि वाघा बॉर्डर याठिकाणी भेट दिली. विशेष म्हणजे या प्रवाशांमध्ये बिमला नावाच्या एक ९० वर्षीय आजीसुद्धा होत्या. या वयात आपल्याला विमान प्रवास घडवल्याबद्दल बिमला आजींनी विकासचे आभार मानले. तर दुसरीकडे ‘विकासने हे पुण्याचे काम केले आहे’, अशी प्रतिक्रिया त्याचे वडील महेंद्र यांनी दिली.


तितली वादळ : ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये हाहाकार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -