घरCORONA UPDATEहरियाणाला हवाय Lockdown 5.0; राज्याच्या सीमा बंद केल्यामुळे मजूर अडकले

हरियाणाला हवाय Lockdown 5.0; राज्याच्या सीमा बंद केल्यामुळे मजूर अडकले

Subscribe

हरियाणा राज्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वढत असल्यामुळे तेथील राज्य सरकार चिंतेत आहे. त्यामुळे सतर्क झालेल्या सरकारने आज दिल्ली-हरियाणा सीमा बंद करुन टाकल्या. तसेच ३१ मे नंतर लॉकडाऊनचा पाचवा टप्पा लावावा, अशाही मानसिकतेमध्ये राज्य आहे. दिल्ली सोबतच सोनीपत, गुरुग्राम आणि फरीदाबाद बॉर्डर बंद करुन कडक निर्बंध लावले गेले आहेत. त्यामुळे शुक्रवार सकाळपासून हरियाणाच्या सीमांवर गाड्यांच्या मोठ्याच मोठ्या रांगा दिसत आहेत. ज्यांनी कायद्याने ई पास काढला आहे, अशा लोकांनाही सीमा ओलांडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

हरियाणा दिल्ली बॉर्डर बंद केल्यामुळे सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ई पास नसणाऱ्यांना तर राज्याच्या बाहेरही जाऊ दिले जात नाहीये. हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी हारियाणाच्या सीमा बंद करण्याचे आदेश दिले असून त्यांनी तसे गृहसचिवांना पत्र लिहून कळवले होते. सीमा बंद असल्यामुळे आज सकाळी शेकडो परप्रांतीय मजुरांनी सरकारच्याविरोधात धरणे आंदोलन केले होते.

- Advertisement -

सीमा बंद करण्याचे कारण सांगताना विज म्हणाले की, हरियाणामधील ८० टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे दिल्ली सीमाभागातील जिल्ह्यांमधून येत आहेत. त्यामुळेच आम्ही दिल्लीच्या सर्व सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला. हरियाणामध्ये सध्या १,५३५ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी १९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

हरियाणाला हवाय लॉकडाऊन

लॉकडाऊनच्या भूमिकेबाबत हरियाणा सरकार आतापर्यंत केंद्र सरकारच्या सोबत राहिली आहे. मात्र यावेळी गृहमंत्री अनिल विज यांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली आहे. दिल्लीतून येणाऱ्या लोकांमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. त्यामुळे दिल्लीतून होणारे स्थलांतर थांबविण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -