Hathras Gangrape Case: आरोपी-पीडितेच्या भावात १०० वेळा कॉल; पोलीस पेचात

हाथरस बलात्कार प्रकरणाला वेगळे वळण आले असून पीडितेचा भाऊ आणि मुख्य आरोपी यांच्यामध्ये तब्बल १०० वेळा फोन कॉल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस तपासात ही बाब उघड झाली असून वारंवार फोन केल्याने समजताच पोलीस देखील पेचात पडले आहेत. या फोन कॉल्सचे नेमके काय कारण असेल?, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणामुळे उत्तर प्रदेश सरकारवर देशभरातून टीका होत आहे. दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून घटनेचा तपास सुरु असून अशातच बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी संदीप आणि पीडितेच्या भावात फोन कॉल झाल्याचे समोर आल्याने प्रकरण गुंतागुंतीचे झाले आहे.

मुख्य आरोपी संदीप आणि पीडितेचा भाऊ यांच्यामध्ये मागील एका वर्षापासून फोन कॉल सुरु होते. 13 ऑक्टोबर 2019 पासून या दोघांमध्ये बोलणं सुरु झाल्याचे तपासातून समोर आले आहे. एकूम कॉलपैकी 62 कॉल पीडितेच्या भावाने स्व:तहून (आऊटगोईंग कॉल) केलेले आहेत. तर आरोपी संदीपने पीडितेच्या भावाला 42 वेळा फोन केला आहे. तसेच बहुतांश फोन कॉल चंदपा या परिसरातून असलेल्या फोन कॉल टॉवरवरुन जोडण्यात आले आहेत. चंदपा हा भाग पीडितेच्या गावापासून फक्त दोन किमी अंतरावर आहे. या सर्व फोन कॉलचे रेकॉर्ड्स पाहता, पीडता आणि मुख्य आरोपी संपर्कात असावेत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा –

Corona : त्वचेत ९ तासांपर्यंत जीवंत राहू शकतो कोरोनाचा विषाणू; तज्ज्ञांचा खुलासा