घरदेश-विदेशआता म्युच्युअल फंडावर मिळणार कर्ज, एचडीएफसी बँकेची नवी योजना

आता म्युच्युअल फंडावर मिळणार कर्ज, एचडीएफसी बँकेची नवी योजना

Subscribe

एचडीएफसी बँकेने खातेदारांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने म्युच्युअल फंडावर तातडीने कर्ज देण्याची नवीन योजना २३ मेपासून सुरु केली. म्युच्युअल फंडावर कर्ज देण्याची ही बँकिंग क्षेत्रातील पहिलीच संकल्पना आहे. गेल्या वर्षी बॅंकेने शेअर्सवर कर्ज देणारी योजना आणली होती. आता म्युच्युअल फंडावरदेखील बँक खातेदारांना तात्काळ कर्ज मिळणार आहे.

जर तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असाल. आणि तुम्हाला तातडीने पैशांची गरज असेल तर तुम्हाला एचडीएफसी बँकेकडून म्युच्युअल फंडावर कर्ज मिळू शकते. एचडीएफसी बँकेने खातेदारांसाठी आणलेली ही नवी योजना असून याचा खातेदारांना चांगलाच फायदा होणार आहे. ही सुविधा तुम्हाला काही सेकंदातच पैसे उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देते.

- Advertisement -

काय आहे ही योजना

सध्या या योजनेअंतर्गत म्युच्युअल फंड आणि इक्विटी शेअर होल्डिंगवर कर्ज घेणे शक्य होणार आहे. मात्र एचडीएफसी बँकेकडून ही कर्ज देण्याची प्रक्रिया ऑनलाईन आणि पेपरलेस असणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे एचडीएफसी बँकेचे बचत खाते असणे गरजेचे आहे. फंड व्यवस्थापनातील ‘सीएएमएस’ (Computer Age Management Services Ltd ) या कंपनीशी बॅंकेने करार केला असून, दहा आघाडीच्या म्युच्युअल फंड कंपन्यांच्या इक्विटी आणि डेब्ट फंडांवर कर्ज मिळेल.

- Advertisement -

कशी असेल प्रक्रिया

म्युच्युअल फंडावर कर्ज मिळवण्याची प्रक्रिया सोपी आहे. तुमच्या इंटरनेट बँकिंग खात्यावर लॉग इन करा. त्यावर म्युच्युअल फंडावर कर्ज मिळवण्यासाठी अप्लाय करा. त्याठिकाणी आलेल्या फॉर्मवरील सर्व माहिती भरा. त्यानंतर तुम्हाला इक्विटी किंवा डेब्ट फंडावर कर्ज हवे आहे का ते भरा. त्यानंतर बँक तुमच्या म्युच्युअल फंडाची पडताळणी करेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, इक्विटी फंडांमागे ५०% पर्यंत कर्ज आणि तुमच्या डेब्ट फंडामागे ८०% पर्यंत कर्ज घेऊ शकता. तर एचडीएफसी बँक इक्विटी फंडांमागे १ ते १० लाख आणि डेब्ट फंडांवर १ कोटीपर्यंत कर्ज मिळू शकते. ही एक ओव्हरड्राफ्ट सुविधा आहे, त्यामुळे यासाठी कोणताही कार्यकाळ लागत नाही, परंतु, दरवर्षी कर्जाचे नूतनीकरण करणे गरजेचे असते.

दस्तावेजाची आवश्यकता नाही

कोणता फंड आणि हवे असलेल्या कर्जाची रक्कम निवडल्यानंतर तुमचा अर्ज प्रक्रियेसाठी जातो आणि काही मिनिटातंच आपल्याला पैसे मिळतात. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुम्हाला एक वेगळे चालू खाते (एचडीएफसी बॅंकेमध्ये) उघडणे आवश्यक आहे. त्या खात्यावर बँक आपली कर्ज रक्कम जमा करेल. म्युच्युअल फंडावर कर्ज मिळवण्याच्या प्रक्रियेला कोणत्याही प्रकारच्या दस्तावेजाची आवश्यकता नसते. तसंच ही प्रक्रिया पूर्णत: ऑनलाईन आहे. त्यासाठी तुम्हाला एचडीएफसी बँकेकडून निधी विकत घेण्याची गरज नसते. दुसऱ्यांकडून खरेदी केलेले युनिट देखील यासाठी पात्र ठरु शकतात. जेव्हा आपण म्युच्युअल फंडावर कर्जाची रक्कम घेतो. तेव्हा आपण त्याचे मालक असतो. जोपर्यंत आपण आपल्या कर्जाची रक्कम परतफेड करत नाही तोपर्यंत ते कोणालाही विकू शकत नाही.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -