घरCORONA UPDATEकोरोनाचा फैलाव झाला कमी; १२ दिवसात १ कोटी कोरोना टेस्ट: आरोग्य मंत्रालयाचा...

कोरोनाचा फैलाव झाला कमी; १२ दिवसात १ कोटी कोरोना टेस्ट: आरोग्य मंत्रालयाचा दावा

Subscribe

देशात दररोज हजारो कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा असा दावा केला आहे की, गेल्या १२ दिवसांत एक कोटी लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे, मात्र कोरोनाचा वाढणारा संसर्ग कमी होऊन त्याचा दरही खाली आला आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, १३ ऑगस्टपर्यंत देशात २.६८ कोटी नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. या कालावधीत संक्रमित नमुन्यांचे प्रमाण ८.९३ टक्के होते, परंतु आता तपासणीची संख्या ३. ६८ कोटी झाली आहे. त्याच वेळी, संसर्ग होणार्‍या नमुन्यांचे प्रमाण ८.६० टक्के झाले आहे.

रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण सतत वाढते

यावरून हे स्प्ष्ट होते की, तपासणीची व्याप्ती वाढत असताना संक्रमित नमुन्यांची संख्या कमी झाली आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये सामील झाल्यानंतरही इतर देशांपेक्षा भारतात अधिक तपास केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे. राजेश भूषण म्हणाले की, देशातील कोरोना विषाणूमुळे बरे झालेल्या रूग्णांची संख्या अॅक्टिव्ह रूग्णांपेक्षा ३.४ पट जास्त आहे. एकूण रुग्णांपैकी अॅक्टिव्ह रुग्ण फक्त २२.२ टक्के आहेत. देशातील कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या रिकव्हरीचे प्रमाण सतत वाढत आहे. तर आता देशात हा दर ७५ टक्क्यांहून अधिक असावा, असे भूषण यांनी सांगितले.

- Advertisement -

तसेच कोरोना विषाणूचा मृत्यूदर १.८ टक्के आहे, जो जगातील सर्वात कमी आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६४०० अॅक्टिव्ह रूग्ण कमी झाले आहेत. एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी केवळ २.७ टक्के रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्याच वेळी, १.९ टक्के रुग्ण आयसीयूवर आहेत आणि ०.२९ टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.


CoronaVirus: २४ तासात ६७,१५१ नव्या रूग्णांची नोंद; १ हजारांहून अधिकांचा मृत्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -