घरदेश-विदेशलस घेतल्यानंतरही आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात!

लस घेतल्यानंतरही आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात!

Subscribe

लस घेतल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस

जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जगभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. नुकताच जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या आठ कोटींच्या पार गेली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आणि कोरोना हद्दपार करण्यासाठी जगभरातील वैद्यकीय तज्ञ कोरोना लस तयार करण्यासाठी कसब पणाला लावत आहेत. अनेक देशांनी कोरोना लस तयार केल्याचा दावा केला आहे. त्यातील काही देशांत कोरोना लसीच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. कित्येक देशांत लसीकरणालाही सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना लसीच्या मानवी चाचण्या सुरु असताना अनेक धक्कादायक घटना समोर आल्या होत्या. अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लंडनमधील एका आरोग्य कर्मचाऱ्याला फायजरची कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे.

कोरोना लस घेतल्यानंतरही कोरोना झाल्याचे काही प्रकरणे उघडकीस आले आहेत. लंडनमधील आरोग्य कर्मचारी डेविड लॉन्गडन याने फायजर कंपनीने तयार केलेली कोरोना लस घेतली होती. हा आरोग्य कर्मचारी लंडनमधील साऊथ वेल्स येथील ब्रिजेंडीमधील प्रिसेंज ऑफ वेल्स रुग्णालयात सेवा देत आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार मागील महिन्यात ८ डिसेंबरला फायजर कंपनीच्या कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. परंतु तरीहि त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे त्याने सांगितले. त्याला कोरोनाची लक्षणे आढळत होती. त्यामुळे कोरोना चाचणी केली. या कोरोना चाचणीचा अहवाल आल्यावर त्याला धक्काच बसला असल्याचे त्याने सांगितले. ठरल्यानुसार या आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोना लसीचा दुसरा डोस ५ जानेवारीला देणे आपेक्षित होते. परंतु नियमांमध्ये बदल केल्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीचा डोस देण्याची तारीख बदलण्यात आली.

- Advertisement -

आरोग्य कर्मचारी डेविडवर रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत. परंतु मी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाली. हे सर्व सरकारी कारभारामुळे झाले असल्याचे डेविडने सांगून सरकारवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. डेविड गेली अनेक दिवस आपत्कालीन विभागत काम करत होते. या विभागात कोरोना रुग्णांना दाखल करण्यात येत होते. या कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली असल्याचे डेविडने सांगितले.

- Advertisement -

कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही अमेरिकेत एका डॉक्टरचा मृत्यू झल्याचीही धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या मायामी शहरात कोरोना लस घेतल्यानंतर एका डॉक्टरचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मृत डॉक्टरच्या पत्नीने असे म्हटले आहे की, कोरोना लस घेतल्यानंतर १६ दिवसांनंतर पतीचा मृत्यू झाला. या मृत डॉक्टरचे नाव ग्रेगरी मायकल असे आहे. कोरोना लस घेण्यापूर्वी ग्रेगरी यांची प्रकृती ठणठणीत होती. परंतु कोरोना लस घेतल्यानंतर ग्रेगरी मायकल यांची प्रकृती बिघडली असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -