घरदेश-विदेशकेरळमध्ये पावसाचे २६ बळी

केरळमध्ये पावसाचे २६ बळी

Subscribe

केरळमध्ये पावसामुळे २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दोन दिवसांपासून केरळमध्ये पावासाचा जोर कायम आहे. NDRFची टीम देखील युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे.

दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने केरळमध्ये सध्या हाहाकार उडवून दिला आहे. पावसामुळे राज्यभरात पूरस्थिती निर्माण झाली असून आत्तापर्यंत २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सखल भागात पाणीच – पाणी असे चित्र असून उत्तर भागामधील जनजीवन सर्वाधिक विस्कळीत झाले आहे. मागील दोन पावसापासून सुरू असलेला पावसाचा जोर कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही आहे. धरणांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाल्याने राज्यातील २२ धरणांचे दरवाजे उघडले गेले आहे. परिणामी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. लष्कराने देखील बचावकार्याला सुरूवात केली आहे. NDRFची टीम देखील बचावकार्य करत आहे. इडुक्की धरणातून १२५ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. केरळाचे मुख्यमंत्री देखील संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. पूरग्रस्त भागात शक्य तेवढी सर्व मदत पोहोचवण्याचे काम सुरू आहे.

वाचा – केरळमध्ये पावसाचे २० बळी

राज्यात पूरस्थिती

मुसळधार पावसामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील केरळातील पावसाबद्दल ट्विट करत केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन दिले आहे. रेस्क्यु ऑपरेशनसाठी लष्कर, नौदल आणि वायुदल देखील सज्ज झाले आहे. गरज पडल्यास NDRFची अतिरिक्त कुमक मागवण्यात येणार आहे. काही भागांमध्ये भूसख्खलन झाल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. दरम्यान, अमेरिकन पर्यटकांनी धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळा असे आवाहन अमेरिकेने केले आहे. केरळा सरकारतर्फे पर्यटकांची देखील योग्य ती काळजी घेतली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -