घरदेश-विदेशहेमंत करकरेंचे 'हे' माजी सहकारी लढवणार साध्वींच्याविरोधात निवडणूक

हेमंत करकरेंचे ‘हे’ माजी सहकारी लढवणार साध्वींच्याविरोधात निवडणूक

Subscribe

मुंबई पोलीस दलातून निवृत्त झालेले माजी सहाय्यक पोलीस आयुक्त रियाज देशमुख यांनी मंगळवारी भोपाळ लोकसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

माळेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात मुंबई एटीएसचे अधिकारी हेमंत करकरे यांच्यावर करण्यात आलेल्या वादग्रस्त आरोपामुळे त्यांचे माजी सहकारी नाराज झाले आहेत. त्यांनी भोपाळ लोकसभा मतदार संघातील भाजपच्या उमेदवारी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलातून निवृत्त झालेले माजी सहाय्यक पोलीस आयुक्त रियाज देशमुख यांनी मंगळवारी भोपाळ लोकसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. भोपाळमध्या पाचव्या टप्प्यात १२ मे रोजी मतदान होणार आहे.

बदनामी होताना पाहू शकत नाही

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, रियाज देशमुख यांनी सांगितले की, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने जेव्हा उमेदवारी दिली तेव्हाच मी ठरवले की, त्यांच्याविरोधात निवडणूक लढायची. कारण मी महाराष्ट्र पोलीस दलातील चांगल्या आणि इमानदार अधिकाऱ्याची बदनामी होताना पाहू शकत नाही. करकरे यांनी मला अनेक कायदेशीर प्रकरणामध्ये चांगले मार्गदर्श केले होते. ते नेहमी माझ्यासोबत उभे राहिले होते. दरम्यान, २००८ मध्ये मालेगाव बॉम्ब स्फोटातील संशयित साध्वी प्रज्ञा सिंह ९ वर्ष जेलमध्ये होती. तिला २०१७ मध्ये जामीन मिळाला.

- Advertisement -

कोण आहेत रियाज देशमुख

२०१६ मध्ये महाराष्ट्रातील अमरावीतचे एसपी पदावर असताना रियाज देशमुख निवृत्त झाले. ते गेल्या तीन वर्षापासून औरंगाबादमध्ये राहतात. त्यांनी ३० वर्षापेक्षा अधिक काळ पोलीस दलामध्ये काम केले आहे. निवृत्तीवेळई ते अमरावती क्राईम ब्रँचचे प्रमुख होते. त्याआधी ते अमरावती क्राईम ब्रँचचे पोलीस निरिक्षक होते.

करकरेंशी होते चांगले संबंध

निवृत्तीनंतर रियाज देशमुख यांनी औरंगाबादमध्ये एक वेब पोर्टल सुरु केले. त्यासोबतच ते नागरिकांना आणि पोलिसांना कायदेशीर प्रकरणामध्ये मार्गदर्शनाची सेवा देत होते. १९८६ च्या बॅचचे सब-इनिस्पेक्टर रियाज देशमुख अकोल्यामध्ये ९ वर्ष कार्यरत होते. त्याच दरम्यान त्यांची ओळख करकरे यांच्याशी झाली. १९८८ मध्ये करकरे अकोल्याचे एसपी पदावर कार्यरत होते. देशमुख त्यावेळी वाशिम पोलीस दलाचे प्रमुख होते. मुंबई २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळी करकरे शहीद झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -