बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून गर्लफ्रेंडने गुप्तांगच कापलं!

तरूणीने तरूणाचे गुप्तांग कापले

एका वैतगलेल्या गर्लफ्रेंडने एक धक्कादायक पाऊल उचललं आहे. पीडित तरूणाने या तरूणीवर मोठा आरोप केला आहे. तरूणीने बॉयफ्रेंडच्या ब्लॅकमेलिंग आणि त्रासाला वैतागून थेट बॉयफ्रेंडचे गुप्तांगच कापले. तरुणीने गुप्तांग कापल्यानंतर त्याला एका खोलीत बंद करुन ठेवलं. तो वेदनांनी कळवळत होता. मात्र महिलेने त्यावर दया दाखवली नाही. ही घटना पाकिस्तानातील लाहोर येथील आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरूण या तरूणीला खूप त्रास देत होता. तिला कायम ब्लॅकमेल करायचा. त्यामुळे या तरूणीने वैतागून अखेर हे पाऊल उचललं. या प्रकरणात पीडित तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीत त्याने लिहिलं आहे की, तो पहिल्यांदा वेहारी जिल्ह्यात राहत होता. ६ महिन्यांपूर्वी तो लाहोरला आला होता. ३७ वर्षीय तरूणाने सांगितले की त्याचे आरोपी तरूणीसोबत शारीरिक संबंध होते. ही तरूणीदेखील गेल्या १८ वर्षांपासून याच भागात रहात होती.

पीडित तरूणाने पोलिसांना सांगितले की, महिलेने फोन करून त्याला एका जागेवर बोलावले. त्यानंतर धारदार हत्याराने त्याच्यावर हल्ला केला. पुढे त्याने सांगितले की तरुणीने त्याचं गुप्तांग कापलं व त्याला एका खोलीत डांबून ठेवलं. तो तरूण बंद खोलीत बराच वेळ ओरडत होता. त्यानंतर शेजाऱ्यांनी तरुणाला रुग्णालयात पोहोचवलं. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदविला आहे. तपासानंतर यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


हे ही वाचा – Video: दिवाळीला ‘लक्ष्मी बॉम्ब’ फुटणार, अक्षयने जाहीर केली चित्रपटाची तारीख!