घरदेश-विदेशचीनवर भारताची ‘हिरो’गिरी

चीनवर भारताची ‘हिरो’गिरी

Subscribe

हिरो सायकलने रद्द केला ९०० कोटींचा करार

भारत-चीन सीमेवर असलेला तणाव आणि चिनी सैन्याने केलेल्या हल्ल्यात 20 जवान शहीद झाल्यानंतर भारताने चीनची आर्थिक कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. भारताकडून चीनला सडेतोड उत्तर दिले जात असताना भारतीय उद्योग कंपन्याही आता पुढे सरसावल्या आहेत. देशातील प्रसिद्ध हिरो सायकल व दुचाकी कंपनीने चीनसोबत केलेला तब्बल 900 कोटींचा करार रद्द करत आपली हिरोगिरी दाखवून दिली. हिरोच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

भारत-चीन तणावामुळे हिरो सायकलने चीनवर बहिष्कार टाकत मोठा निर्णय घेतला आहे. हिरो सायकलने चिनी कंपनीशी केलेला ९०० कोटींचा व्यवहार रद्द केला आहे. हा व्यवहार येत्या तीन महिन्यांत पूर्ण केला जाणार होता. दुसरीकडे हिरो कंपनीने सायकलचे सुटे भाग बनवणार्‍या छोट्या कंपन्यांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. तसेच या कंपन्यांना हिरो कंपनीत समाविष्ट होण्याची ऑफर देण्यात येत आहे. यातून हिरो कंपनीने स्वदेशी कंपन्यांना चालना देण्याचा प्रयत्नही सुरू केला आहे. यामुळे हिरो सायकल कंपनीचा हा मोठा निर्णय मानला जात आहे.

- Advertisement -

हिरो सायकलने चीनसोबतचा सर्व प्रकारचा व्यापार बंद केला आहे. यानंतर हिरो सायकल कंपनीने आपला प्लांट जर्मनीमध्ये सुरू करण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. जर्मनीतील या प्लांटमधून संपूर्ण युरोपात हिरो सायकलचा पुरवठा केला जाईल. गेल्या काही दिवसांमध्ये हिरो सायकलच्या मागणीत वाढ झाली आहे. यानुसार हिरो सायकलनेही आपली क्षमता वाढवली आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेक छोट्या कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता या छोट्या कंपन्याची नुकसानभरपाई हिरो सायकलकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -