गुजरात किनारपट्टीच्या भागास अतिदक्षतेचा इशारा

'वायू' चक्रीवादळ हे गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

Ahmadabad

गुजरात आणि महाराष्ट्र किनारपट्टीच्या दिशेने ‘वायू’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली होती. मात्र आता ‘वायू’ चक्रीवादळ हे गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. १४० ते १५० किलोमीटर इतका वाऱ्याचा वेग असेल. यामुळे गुजरात किनारपट्टीवर भागात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.

याआधी ओडीसा किनारपट्टीवर फॅनी चक्रीवादळ धडकले होते. त्याच पार्श्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांन सोबत बैठक घेतली. ओडिसा सरकाराने ‘फॅनी’ चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केला होत्या याची माहित घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चक्रीवादळाचा ज्या ठिकाणी मोठा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. अशा १० जिल्ह्यांमध्ये १३ आणि १४ जूनला शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याची घोषणा केली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी लागणाऱ्या उपाययोजना संदर्भात अधिकाऱ्यांना आदेश दिले. यादरम्यान शाह यांनी या आपत्कालीन परिस्थितीत गुजरातमध्ये २६ एनडीआरएफची पथके याआधीच पाठविण्यात आली होती. मात्र त्यामध्ये आणखी १० पथके पाठवण्यात येणार आहे. तसेच तिन्ही दलांना ही सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे.
या सर्व परिस्थितीची पाहणी ही विमान आणि हेलिकॉम्टर्सने सुरु आहे. १३ आणि १४ जून हे दिवस गुजरातसाठी महत्त्वाचे दिवस आहेत.

‘वायू’ चक्रीवादळ हे अरबी समुद्रात तयार होत असल्यामुळे भारतामध्ये चीनच्या दहा जहाजांना रत्नागिरीच्या बंदरावर आश्रय देण्यात आला आहे. त्यामुळे गुजरातसह महाराष्ट्राला देखील ‘वायू’ चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.