अयोध्येला छावणीचा स्वरूप

६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मस्जिद पाडली गेली. त्या घटनेला आज २६ वर्षे पूर्ण झाली. त्याच पार्श्वभूमिवर हिंदु संघटनांनी शौर्य दिवस तर मुस्लिम संघटनांनी काळा दिवस पाळण्याचं आव्हान केलं आहे.

Ayodhya
Babri Masjid Ayodhya
संग्रहित छायाचित्र

६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मस्जिद पाडली गेली. त्या घटनेला आज २६ वर्षे पूर्ण झाली. त्याच पार्श्वभूमिवर हिंदु संघटनांनी शौर्य दिवस तर मुस्लिम संघटनांनी काळा दिवस पाळण्याचं आव्हान केलं आहे. त्यामुळे अयोध्येतील वातावरण काहीसं गरम असल्याचं जाणवत आहे. या साऱ्या घटना पाहता पोलिसांनी मात्र खबरदारीचं पाऊल उचललं आहे. अयोध्येमध्ये सध्या कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अयोध्येला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. अयोध्येतील प्रत्येक कोपऱ्यावर पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे. तसंच वाहनांची देखील तपासणी केली जात आहे. तर, दुसरीकडे बाबरी मस्जिद पाडल्याच्या विरोधात कोर्टात बाजू मांडणारे वकिल इक्बाल अंसारी यांना मात्र एका  निनावी पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. या सर्व घडामोडी पाहता जिल्ह्यामध्ये १४४ कलम लागू करण्यात आलं आहे.

वाचा – राम मंदिर बांधण्यावरुन जैश-ए-मोहम्मदचा मोरक्याची भारताला धमकी

राम मंदिराचा मुद्दा चर्चेत

बाबरी मस्जिद पाडल्यानंतर राम मंदिराच्या उभारणीची मागणी जोर धरू लागली. शिवाय, आता २०१९च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्यानं राम मंदिराच्या बांधणीच्या मागणीला पुन्हा एकदा जोर चढला आहे. पण, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. शिवसेनेनं देखील अयोध्या दौरा करत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं जमिनीचं अधिग्रहण करा, कायदा करा अशी मागणी केली आहे. त्यामुळे भाजप समोरची अडचण आणखी वाढली आहे. विहिंपसह काही हिंदुत्ववादी संघटना देखील आता अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उभारणी झाली पाहिजेच अशी आग्रही मागणी करताना दिसत आहेत. पण, सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्यानं भाजप मात्र यावर काहीही न बोलणं पसंत करत आहे.

वाचा – बाबरी मशीद १७ मिनिटांत उध्वस्त केली; आता राममंदिर…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here