घरअर्थजगतमहागात पडली महागाई! सरकारी आकडेवारी जाहीर!

महागात पडली महागाई! सरकारी आकडेवारी जाहीर!

Subscribe

डिसेंबर २०१९ या महिन्यात महागाईचा दर गेल्या ५ वर्षांतला सर्वाधिक दर नोंदवला गेला आहे.

कांद्याने वाढलेल्या दरांमुळे कापण्याआधीच लोकांच्या डोळ्यांतून पाणी काढलेलं असतानाच इतर भाजीपाला आणि इंधनासारख्या गोष्टींच्या चढ्या दरांमुळे सामान्यांचं कंबरडं आणि आर्थिक गणित असे दोन्ही मोडले आहेत. मात्र, असं असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मात्र सारंकाही आलबेल असल्याचंच सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारच्याच सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये देशातली महागाई सामान्यांना किती महागात पडली, हे स्पष्ट झालं आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये यंदा महागाईचा सर्वाधिक दर असल्याचं या आकडेवारीवरून समोर आलं आहे. एकट्या डिसेंबर महिन्यात किरकोळ बाजारात महागाईचा दर थेट ७.३५ टक्क्यांवर जाऊन भिडला आहे!

- Advertisement -

गेल्या वर्षभरात म्हणजेच मोदी सरकारची दुसरी टर्म सुरू झाल्यापासून अर्थव्यवस्थेने उलट्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक अर्थतज्ज्ञांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केलेली असतानाच आता या नव्या आकडेवारीमुळे केंद्र सरकारसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये हा दर ५.५४ टक्के होता. मात्र महिन्याभरातच हा दर ७.३५ वर पोहोचला आहे. डिसेंबर २०१८मध्ये म्हणजेच वर्षभरापूर्वी हा दर २.११ टक्के इतकाच होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -