घरदेश-विदेशसरकारी कर्मचाऱ्यांकरता खूशखबर; महागाई भत्त्यात वाढ

सरकारी कर्मचाऱ्यांकरता खूशखबर; महागाई भत्त्यात वाढ

Subscribe

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली असल्याने केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनाकरता ही आनंदाची बातमी आहे.

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांकरता एक खूशखबर आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ २ टक्क्यांनी करण्यात आली असून या आधी हा महागाई भत्ता ७ टक्क्यांनी मिळत होता आता त्यात वाढ होऊन हा महागाई भत्ता ९ टक्क्यांनी मिळणार आहे.

या कर्मचाऱ्यांना होणार महागाई भत्त्याचा लाभ

सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या ७ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. आता या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ होऊन हा भत्ता ९ टक्क्यांनी मिळणार आहे. सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांना या महागाई भत्त्याचा लाभ होणार आहे. सुमारे ४८ लाख सरकारी कर्मचारी आणि ६० लाख पेंशनधारकांना याचा लाभ घेता येणार आहे.

- Advertisement -

कधीपासून होणार महागाईभत्ता लागू

केंद्रीय मंत्रीमंडळाची नुकतीच बैठक पार पडली. या मंत्रिमंडळाच्या मंजूरीनंतर १ जुलै २०१८ पासून महागाई भत्त्याचा निर्णय लागू होणार आहे. या आधी देखील २ टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्यात आला होता.

महागाई भत्ता म्हणजे काय?

महागाई भत्ता सरकारी कर्मचारी, पब्लिक स्केटरमध्ये काम करणारे कर्मचारी आणि पेंशनधारकांना दिला जातो. या कर्चमाऱ्यांच्या मूळ पगाराच्या आधारावर हा महागाई भत्ता निश्चित केला जातो. महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता दिला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -