रामचंद्र हे मुस्लिमांचेही पूर्वज – रामदेवबाबा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदीचा मुद्दा गाजत असताना योगगुरू रामदेवबाबांनी वक्तव्य केले आहे. रामचंद्र हे फक्त हिंदूचेंच नाही तर मुस्लिमांचेही पूर्वज असल्याचे त्यांनी वक्तव्य करावे.

New Delhi
Ramdev Baba And Loard ram
योगगुरू रामदेवबाबा

देशात निवडणुकीचे वारे वाहत असताना राम मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यामुद्यावरून अनेक राजकीय नेत्यांनी वक्तव्य केल्यानंतर आता योगगुरू रामदेवबाबांनी ही या मुद्यावर भाष्य केलं आहे. प्रभू रामचंद्र हे फक्त हिंदूंचेच नाही तर मुस्लिमांचेही पूर्वज आहेत, त्यामुळे राम मंदिर होणारच असे त्यांनी म्हटले आहे. अयोध्येत जर राम मंदिर होणार नाही तर काय मक्का मदिना किंवा व्हॅटिकनमध्ये होणार का? असा सवालही त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याचीही मागणी त्यांनी केली.

शिवसेने केली होती मागणी

अयोध्येतील राम मंदिर लवकर बांधण्यात यावे यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला भेट दिली होती. देशातील साधू संतानीही मंदिर बनवण्याची मागणी केली आहे. राम मंदिर नाही तर मत नाहीत असे बॅनरही लावण्यात आले. राम मंदिराचा प्रश्न अजूनही न्यायालयात असल्यामुळे यावर निर्णय अद्याप झालेला नाही. विरोधकांनीही राम मंदिराच्या मुद्यावरून भाजपला घेरले होते.

काय म्हणाले बाबा

“प्रभू रामचंद्रांच मंदिर हे अयोध्येतच झाले पाहिजे. मंदिर अयोध्येत नाही तर काय मक्का मदिनेत होणार का? अयोध्या ही रामाची जन्मभूमी आहे हे सत्य आहे. प्रभू रामचंद्र हे फक्त हिंदूंचेच नाही तर मुस्लिमांचेही पूर्वज आहेत.” – योगगुरू रामदेवबाबा