घरट्रेंडिंगअमेरिकन पबमध्ये शौचालयात हिंदू देवी-देवतांचे फोटो!

अमेरिकन पबमध्ये शौचालयात हिंदू देवी-देवतांचे फोटो!

Subscribe

अमेरिकेच्या एका पबमध्ये हिंदू देवी देवतांचे फोटो शौचालयात लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला होता. या प्रकरणावरून सोशल मीडियावर बराच वाद झाला.

काही महिन्यांपूर्वी अॅमेझॉन या वेबसाईटवर हिंदू देवी-देवतांचे फोटो असलेल्या चपला विकण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या मुद्द्यावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाल्यानंतर अॅमेझॉनने या वस्तू वेबसाईटवरून काढून टाकल्या. मात्र, आता पुन्हा एकदा हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी आरोपीच्या पिंजऱ्यात अॅमेझॉन नसून अमेरिकेतला एक पब आहे. या पबमध्ये देवी-देवतांची चित्रे आक्षेपार्ह पद्धतीने लावण्यात आल्यामुळे त्यावर सोशल मीडियावर टिकेची झोड उठली. तिथल्या एका भारतीय तरुणीने त्यावर तीव्र आक्षेप घेत पबच्या मालकांना पत्रही पाठवले. अखेर वाढता विरोध लक्षात घेता ही छायाचित्रे हटवण्याचं आश्वासन या तरुणीला देण्यात आलं आहे.

हा सगळा प्रकार अमेरिकेच्या बुशविक प्रांतात असणाऱ्या हाऊस ऑफ येस या पबमध्ये मागच्या महिन्यात २९ सप्टेंबरला घडला. आणि या पबला धारेवर धरणाऱ्या तरुणीचं नाव आहे अंकिता मिश्रा. अंकिताने हा सगळा घडलेला प्रकार तिच्या ब्लॉगवर कथन केला आहे.

- Advertisement -

नक्की घडलं काय?

मागच्या महिन्यात अंकिता तिच्या मित्रांसोबत हाऊस ऑफ येस पबमध्ये नाईट आऊटसाठी गेली होती. यावेळी पबच्या व्हीआयपी शौचालयाचा वापर करण्यासाठी अंकिता गेली असता तिथल्या दृश्यामुळे तिला धक्काच बसला. शौचालयाच्या भिंतींवर गणपती, सरस्वती, काली माता आणि शंकराचे फोटो लावण्यात आले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अंकिताने लागलीच पबच्या मालकांच्या नावे एक खरमरीत पत्रच मेलवर लिहून पाठवलं. यामध्ये ६ मुद्द्यांच्या आधारे अंकिताने पबच्या मालकांना घडलेला प्रकार व्यवस्थित समजावून सांगितला. आणि यावर काय कारवाई होणं अपेक्षित आहे, हेही सांगितलं.

American Pub House of Yes Bathroom with Hindu Goddess Photos (PC - Ankita Mishra)
हाऊस ऑफ येस या अमेरिकन पबमध्ये देवी देवतांचे फोटो (सौ. – अंकिता मिश्रा)

अंकिताच्या पत्रावर पबची प्रतिक्रिया काय होती?

साधारणपणे अशा पत्रांना किंवा तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र, अंकिताने आक्रमकपणे तिचा मुद्दा मांडल्यामुळे पबचालकांना तिच्या पत्राची दखल घ्यावीच लागली. अंकिताच्या पत्राला पबच्या सहसंस्थापक की बर्क यांनी लागलीच प्रतिक्रिया दिली. संबंधित शौचालय शक्य तितक्या लवकर बंद करून त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील असं आश्वासन त्यांनी या पत्रामध्ये दिलं. आणि अखेर या प्रकरणावर पडदा पडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -