घरताज्या घडामोडी'टुकडे टुकडे गँग' असं काहीही नाही; माहिती अधिकारात धक्कादायक बाब उघड!

‘टुकडे टुकडे गँग’ असं काहीही नाही; माहिती अधिकारात धक्कादायक बाब उघड!

Subscribe

अमित शाह अनेक वेळा भाषणांमध्ये उल्लेख करत असलेल्या टुकडे-टुकडे गँगविषयी देशाच्या गृहमंत्रालयाकडे काहीही माहिती नाही, असा धक्कादायक खुलासा खुद्द गृह मंत्रालयाकडूनच माहिती अधिकारांतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर करण्यात आला आहे.

भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह यांच्या भाषणांमध्ये आणि प्रचार सभांमधून अनेकदा ‘टुकडे-टुकडे गँग’ असा उल्लेख केला जाताना ऐकण्यात आला आहे. टुकडे-टुकडे गँगकडून देशात अशांतता पसरवण्याचं काम होत असल्याचे देखील आरोप केले गेले. शिवाय, या गँगचे सदस्य देशात फूट पाडण्याचं काम करत असल्याचा देखील दावा अमित शाह यांनी अनेकदा केला. मात्र, देशात अशी कोणती टुकडे टुकडे गँगच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे अमित शाह यांच्या हातात असेल्या गृह मंत्रालयानेच यासंदर्भात माहिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी यासंदर्भात विचारणा करणारा माहिती अर्ज दाखल केला होता. २६ डिसेंबर २०१९ रोजी त्यांनी हा अर्ज दाखल केला होता. त्यावर गृहमंत्रालयाने हे उत्तर दिलं आहे.

काय आहे खुलासा?

साकेत गोखले यांनी माहिती अधिकार अर्जातून टुकडे टुकडे गँग कधी अस्तित्वात आली? गँगचे सदस्य कोण आहेत? या गँगवर कारवाई का केली जात नाही? यावर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, त्याच्या उत्तरादाखल २६ गृहमंत्रालयाने मोठा खुलासा केला आहे. ‘गृह मंत्रालयाकडे टुकडे-टुकडे गँगविषयी काहीही माहिती नाही’, असं या अर्जाच्या उत्तरात साकेत गोखले यांना कळवण्यात आलं आहे. त्यामुळे आता अमित शहा कशाच्या आधारावर टुकडे टुकडे गँगचा उल्लेख करून जाहीर सभांमधून आरोप करत होते? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. दरम्यान, या प्रकारासाठी अमित शहांनी देशाची माफी मागायला हवी, अशी मागणी साकेत गोखले यांच्याकडून केली गेली आहे.

- Advertisement -

दिल्लीच्या जेएनयू मध्ये ‘भारत तेरे टुकडे होंगे’, अशा प्रकारच्या घोषणा काही अज्ञात देत असल्याचे व्हिडिओ काही वर्षांपूर्वी व्हायरल झाले होते. तेव्हापासून भारतामध्ये फूट पाडण्यासाठी कार्यरत असलेल्या लोकांना उद्देशून टुकडे टुकडे गँग असा उल्लेख भाजपकडून वापरला जात आहे. विशेषत: कन्हैय्या कुमार, उमर खालिद आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांवर या घोषणा दिल्याचा आरोप ठेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप देखील लावण्यात आला होता. मात्र, कालांतराने हे आरोप रद्द करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -